Anil Kapoor, who appeared says as 'One Two Ka Four' | ‘वन टू का फोर’ म्हणत अवतरला अनिल कपूर 
‘वन टू का फोर’ म्हणत अवतरला अनिल कपूर 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांचे सर्वाधिक गाजलेले गीत ‘वन टू का फोर’ चे सूर सभागृहात घुमले.. अनिल कपूर प्रत्यक्षात मंचावर अवतरल्याचे पाहून श्रोते अचंबित झाले. पण हा खराखुरा अनिल कपूर नव्हता तर त्यांचा डुप्लिकेट होता.
हार्टबिट्सच्यावतीने गुड फ्रायडेच्या पर्वावर डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात संगीतमय कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. यात ज्युनिअर आर्टिस्ट अनिल कपूर आणि गोविंदा यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाची संकल्पना नितीन झाडे व प्रशांत वलिवकर यांची होती. विजय जथे, युवराज माथनकर यांची उपस्थिती होती.
प्रशांत सहारे, गोपाल के. अय्यर यांच्यासह संजीवनी बुटी, अनुष्का काळे, सुनिता कांबळे, परिणिता माथुरकर यांनी सुरुवातीला अनिल कपूर व गोविंदा यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांचा नजराणा सादर केला. ज्युनिअर अनिल कपूर यांचे मंचावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या सोबत विदर्भाचे किशोर कुमार सागर मधुमटके व गोविंदाही होते. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. संगीत संयोजन उल्हास चिटमुलवार यांचे होते. प्रशांत सहारे व संजीवनी बुटी यांनी आयोजन केले होते.


Web Title: Anil Kapoor, who appeared says as 'One Two Ka Four'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.