पक्ष पुन्हा उभा करू – अनिल देशमुख
By Admin | Updated: February 27, 2017 14:50 IST2017-02-27T14:27:01+5:302017-02-27T14:50:07+5:30
आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागपूर महानगरपालिका निवडणूकीत यश मिळू शकले नाही म्हणून नाउमेद न होता परत जिद्दीने कामाला लागू.

पक्ष पुन्हा उभा करू – अनिल देशमुख
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि २७ - आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागपूर महानगरपालिका निवडणूकीत यश मिळू शकले नाही म्हणून नाउमेद न होता परत जिद्दीने कामाला लागू व नागपूर शहरात पक्ष पुन्हा उभा करू असे प्रतिपादन माजी मंञी अनिल देशमुख यांनी केले.
या निवडणूकीत काँग्रेस मधील विविध गटांमध्ये व्यवस्थित समन्वय नसल्यामुळे व त्यामुळे राष्ट्रवादी पक्षा बरोबर आघाडी न झाल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे नुकसान झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी अलग अलग लढल्यामुळे काँग्रेसचे जवळपास ३० जागेवर तर राष्ट्रवादीचे जवळपास १२ जागेवर नुकसान झाले. त्याचाच फायदा भाजपा ला मिळाला.
माझ्याकडे असलेली शहर अध्यक्षाची जबाबदारी लवकरात लवकर दुसऱ्याकडे देवून शहराचे सर्व कार्यकर्ता व आम्ही नविन शहर अध्यक्षाच्या पाठीमागे राहुन जुन्या व नविन सहकाऱ्यांसोबत परत जोमाने कामाला लागू व पक्ष पुन्हा उभा करू, असे माजी मंञी अनिल देशमुख म्हणाले.