शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आंध्र प्रदेशप्रमाणे राज्यातदेखील 'दिशा'सारखा कायदा आणणार : गृहमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 10:55 PM

महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना पुरावे असतील तर त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आंध्र प्रदेशने ‘दिशा’ नावाचा कायदा संमत केला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात ५८ महिन्यांत २२ हजार बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना पुरावे असतील तर त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आंध्र प्रदेशने ‘दिशा’ नावाचा कायदा संमत केला आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतल्यानंतर राज्यातदेखील अशा प्रकारचा कायदा लवकरात लवकर आणण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.मनीषा कायंदे यांनी महिला अत्याचारासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेदरम्यान सभागृहात सरकारवर विविध प्रश्नांचा भडीमार झाला. मनीषा कायंदे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाई गिरकर यांच्यासह विविध सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आंध्र प्रदेशप्रमाणे कठोर कायदा करणार का, अशी विचारणा केली. आंध्र प्रदेशकडून आम्ही ‘दिशा’ कायद्याची माहिती घेतली आहे. सबळ पुरावा असेल तर आरोपींना तेथे २१ दिवसांत मृत्युदंडाची शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे. राज्यातील विद्यमान कायद्यानुसार जन्मठेपा किंवा फाशीची शिक्षा दिली जाते. परंतु ‘दिशा’च्या माध्यमातून आंध्र प्रदेशने थेट फाशीची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातदेखील ‘दिशा’सारखा कायदा करण्याचा शासनाचा विचार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याशी यासंदर्भात चर्चादेखील झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.२५ विशेष न्यायालये स्थापनमहिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. खटले वेगाने निकाली काढावेत यासाठी राज्यात २५ विशेष न्यायालये व २७ जलदगती न्यायालये स्थापन झाली आहेत. तसेच केंद्राने महाराष्ट्रासाठी बालकांवरील अत्याचारांच्या खटल्यासाठी ३० विशेष न्यायालये व महिलांवरील अत्याचारांच्या खटल्यासाठी १०८ विशेष फास्टट्रॅक न्यायालये मंजूर केली आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘सायबर’ गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यात ४७ पैकी ४३ पोलीस ठाणी कार्यान्वित झाली आहेत. ‘सायबर’ गुन्हे विभागातील १६४ हंगामी जागा दोन महिन्यांत भरण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.महिला अत्याचाराचे प्रमाण वाढीसदरम्यान, गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१९ या ५८ महिन्यांच्या कालावधीत राज्यात महिला अत्याचाराच्या तब्बल २२ हजार ७७ प्रकरणांची नोंद झाली, तर महिला अपहरणाचे ३३ हजार ८२२ गुन्हे नोंदविण्यात आले. विनयभंगाच्या गुन्ह्यांचा आकडा ६० हजार ६४६ इतका होता. पुरोगामी राज्यात हुंडाबळीचे १ हजार १२० गुन्हे नोंदविण्यात आले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदे