शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

नागपुरात युवक काँग्रेसच्या निवडणुकीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 21:39 IST

युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत बुधवारी गोंधळ झाला. ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या प्रक्रियेत प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान करण्यात आले. दरम्यान, पश्चिम नागपूरसाठी एहबाब कम्युनिटी हॉलमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करीत उमेदवार व समर्थकांनी गोंधळ घातला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र ही अंतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देबोगस मतदानाचा आरोप : १२५०० पैकी फक्त ५०२३ मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत बुधवारी गोंधळ झाला. ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या प्रक्रियेत प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान करण्यात आले. दरम्यान, पश्चिम नागपूरसाठी एहबाब कम्युनिटी हॉलमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करीत उमेदवार व समर्थकांनी गोंधळ घातला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र ही अंतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे.मतदानाच्या अंतिम दिवशी पश्चिम व दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. या मतदानाबाबत युवक काँग्रेसच्या मतदारांंमध्ये उत्सुकता दिसून आली नाही. एकूण १२५०० मतदारांपैकी फक्त ५०२३ मतदारांनी मतदान केले. दुपारी ३ वाजता मतदान संपल्यानंतर युवक काँग्रेसच्या एका गटाने बोगस मतदानाचा आरोप करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शहराध्यक्षपदाचे उमेदवार धीरज पांडे म्हणाले, आपण मतदान केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी ठेवण्याची मागणी केली होती. दक्षिण पश्चिम नागपुरातील मतदान केंद्रात प्रतिनिधी होते. पश्चिम नागपुरातील एका केंद्रावर ग़डबड झाल्याची माहिती त्यांना मिळाली. दुसरे एक उमेदवार तौसिफ खान व इरशाद शेख तेथे उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करीत गोंधळ घातला. या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी तेथे उपस्थित झेडआरओ सोबत धक्काबुक्की केली.आज मतमोजणीआज, गुरुवारी सकाळी १० वाजता देवडिया काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष, महामंत्री व विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणी होईल. शहर अध्यक्षपदासाठी धीरज पांडे, तौसिफ खान व इरशाद शेख यांच्यात सामना होईल, अशी चिन्हे आहेत. यानंतर प्रदेश पदाधिकाऱ्यांसाठी मतमोजणी होईल. ही मतमोजणी कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. नागपूर किंवा पुणे असे दोन पर्याय समोर आले आहेत.असे झाले मतदानमतदारसंघ            एकूण मतदार             मतदानउत्तर नागपूर                ३३००                       ११५१पूर्व नागपूर                   ११००                       ४९१मध्य नागपूर                ३६००                      १२९०दक्षिण नागपूर            २३००                       ११००पश्चिम नागपूर             ११२८                       ५३०दक्षिण नागपूर            ९००                         ४११

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक