ंनंदा पराते यांची निर्दोष सुटका
By Admin | Updated: April 26, 2015 02:20 IST2015-04-26T02:20:43+5:302015-04-26T02:20:43+5:30
गडचिरोली येथील अनुसूचित जमाती, जात प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर धडक घातल्या

ंनंदा पराते यांची निर्दोष सुटका
नागपूर : गडचिरोली येथील अनुसूचित जमाती, जात प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर धडक घातल्या प्रकरणीच्या खटल्यातून आदिम संविधान संरक्षण समितीच्या अध्यक्ष अॅड. नंदा पराते यांची गडचिरोली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र नियमबाह्य आहे, असा ठपका ठेवून अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोलीकडून प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली होती.
या जात पडताळणी समितीने हलबा जमातीच्या बांधवांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सुनावणी ठेवली होती. आदिम संविधान संरक्षण समितीच्या अध्यक्ष अॅड. नंदा पराते यांच्या नेतृत्वाखाली हलबा बांधवांनी सुनावणीच्या वेळी एकत्र येऊन सहाआयुक्त वसंत पाटील यांना प्रमाणपत्र खोटे नसल्याचे स्पष्ट केले होते.
यावेळी आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. नंदा पराते यांनी जात प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयावर धडक दिली. या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व अॅड. नंदा पराते यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गडचिरोली जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यात अॅड. पराते यांची सुटका झाली.(प्रतिनिधी)