शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित कारचा थरार, पाच झोपड्या उडवत मजुरांच्या अंगावर चढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 11:18 IST

पाच मजूर जखमी, वीटभट्टी चौकाजवळील घटना

नागपूर : वेगात चाललेली कार अनियंत्रित झाल्याने थेट झोपडपट्टीत शिरली व पाच झोपड्या नेस्तनाबूत झाल्यावरच थांबली. संबंधित झोपड्यांमध्ये मजूर झोपले होते. मात्र, कारचे चाक बांबूंमध्ये अडकल्यामुळे कार थांबली व थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. तरीदेखील या घटनेत पाच मजूर जखमी झाले असून, या अपघातामुळे मध्यरात्री थरकाप उडाला होता. यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली.

वीटभट्टी चौकाजवळील मोकळ्या जागेत झाडू बनवून त्यांची विक्री करणाऱ्यांच्या अनेक झोपड्या आहेत. हे सर्व लोक छत्तीसगड राज्यातून आलेले आहेत. मध्यरात्रीच्या १२.१० च्या सुमारास कार (क्र. एमएच ३३ ए ४३३४) वेगाने पॉवर ग्रिड चौकाच्या दिशेने जात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व दुभाजकावरून कार थेट झोपड्यांमध्ये घुसली. काही मजूर त्यावेळी जेवण करत होते, तर काही कुटुंबीयांसह झोपलेले होते. कारचा वेग जास्त असल्याने पाच झोपड्या जमीनदोस्त झाल्या. तेथील बांबूंमध्ये चाक अडकल्याने कार थांबली, अन्यथा पुढील झोपड्यांमध्ये झोपलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांच्या प्राणावर संकट आले असते.

जोरदार आवाजामुळे सर्वांनी धाव घेतली असता भयंकर दृश्य दिसले. जखमी मजुरांना झोपड्यांतून बाहेर करण्यात आले. दुसरीकडे कारदेखील चक्काचूर झाल्याने चालक आत अडकला होता. यशोधरानगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. खूप प्रयत्नांनंतर कारचा दरवाजा तोडून कारचालकाला बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले. सुमित वालिया, गोकर्ण सिसोदियासह पाच मजूर जखमी झाले. पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मजुरांची भांडीकुंडी तुटली; संसार विस्कटला

फुटपाथशेजारी असलेल्या या झोपड्यांमध्ये मजूर कुटुंबासह राहतात. या अपघातात पाच झोपड्यांचे नुकसान झाले. गाडीचा वेग जास्त असल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या जवळची भांडीदेखील तुटली, तर कपडे फाटून खराब झाले.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर