शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधानाची एक मूळ प्रत नागपुरात आजही संग्रहित

By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2024 17:44 IST

दीक्षाभूमीच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ठेवा सुरक्षित : बाबासाहेबांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी दिली होती भेट

आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे जगभरातील देशासाठी प्रेरक मानले जाते. अमलात आणल्यापासून त्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत व हीच लवचिक विशेषतः त्यात आहे. मात्र, त्यावेळी संसदेत अनेक दिवस चर्चा करून तयार झालेली संविधानाची मूळ प्रत देशासाठी महत्त्वाचा दस्तावेज होय. ही दुर्मीळ मूळ प्रत भारतीय संसदेसह देशात काही निवडक ठिकाणीच ठेवली आहे. तो मान नागपूरच्या दीक्षाभूमीलाही मिळाला आहे. बाबासाहेबांचे विश्वासू दादासाहेब गायकवाड यांनी ही प्रत त्यावेळी दीक्षाभूमीला भेट दिली होती, जी आजही येथे संग्रही आहे.

भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी, बाबासाहेबांच्या अनेक आंदोलनात ते सोबत होते. रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली तेव्हा त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांनीच केले होते. रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्य म्हणूनही कार्य केले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या स्मारक समितीचे ते पहिले अध्यक्षही होते. त्यांच्याच नेतृत्वात दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान तयार केले. तेव्हा त्याच्या काही मूळ प्रती तयार करण्यात आल्या होत्या. त्यापासून नंतर फोटो कॉपी तयार करून ती सर्व सदस्यांना वितरित करण्यात आली होती. त्यातील एक प्रत दादासाहेब गायकवाड यांनाही मिळाली होती. ती प्रत दादासाहेबांनी दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला भेट दिली. तेव्हापासून ही प्रत आजही महाविद्यालयाच्या ग्रंथालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

"डॉ. आंबेडकर महाविद्यालयात संविधानाची मूळ प्रत असणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. दादासाहेब गायकवाड यांच्याकडून मिळालेला हा ऐतिहासिक दस्तावेज अधिक काळापर्यंत टिकावा आणि येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळत राहावी, यासाठी यावर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे, त्यादिशेने प्रयत्न सुरू आहेत." - डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनnagpurनागपूर