अ‍ॅम्वे करते कायद्याचे पालन

By Admin | Updated: June 27, 2015 03:11 IST2015-06-27T03:11:37+5:302015-06-27T03:11:37+5:30

अ‍ॅम्वे इंडिया कंपनीतर्फे अन्न सुरक्षा व मानक कायद्याचे काटेकोर पालन करून पोषक उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे.

Amway to obey the law | अ‍ॅम्वे करते कायद्याचे पालन

अ‍ॅम्वे करते कायद्याचे पालन

मंजुरी नाकारलेल्या उत्पादनांची विक्री नाही
नागपूर : अ‍ॅम्वे इंडिया कंपनीतर्फे अन्न सुरक्षा व मानक कायद्याचे काटेकोर पालन करून पोषक उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणने मंजुरी नाकारलेल्या कोणत्याही उत्पादनांची विक्री केली जात नाही. प्राधिकरणची मंजुरी नसलेल्या सात उत्पादनांची विक्री थांबविण्यात आली आहे. कंपनीने ही माहिती कळविली आहे. अ‍ॅम्वे एनओसी मुदत संपलेल्या उत्पादनांची विक्री करते हा आरोप चुकीचा आहे. कंपनीची न्यूट्रीलाईट उत्पादने सुरक्षित असून ती व्हिटॅमिन्स व मिनरल्सच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करतात. भारतीय व इतर बाजारपेठांमध्ये विक्री करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या गुणवत्तेत व सुरक्षिततेमध्ये कोणतीही उणीव नाही. न्यूट्रीलाईट हा व्हिटॅमिन्स व डाएटरी सप्लिमेंटस्चा जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड मानला जातो. डब्ल्यूएचओ व एफएओ यांनी दिलेल्या व्हिटॅमिन्स व मिनरल्सच्या उच्चत्तम मर्यादांच्या तुलनेत भारतीय न्यूट्रास्युटिकल्स, फूड सप्लिमेंट व फूड फॉर स्पेशल डाएटरी यूझेस यातील सध्याची आरडीए मर्यादा कमी आहे. याची दखल घेऊन प्राधिकरणने अन्नपदार्थ व हेल्थ सप्लिमेंटस्मध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल्सची आरडीए मर्यादा किती असावी याची सूचना इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चला दिली आहे. ही संस्था आरडीए मर्यादांचे मूल्यांकन करते, असे कंपनीने सांगितले आहे.

Web Title: Amway to obey the law