शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

अमृत योजना आता मजिप्राकडे; नागपूर शहरालगतच्या भागाला पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:52 IST

केंद्र सरकारच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरालगतच्या अनधिकृत, अधिकृत वस्त्या व झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. २२७ कोटींची ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्याचा निर्णय मंगळवारी मुंबई येथे घेण्यात आला.

ठळक मुद्दे२२७ कोटींची योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरालगतच्या अनधिकृत, अधिकृत वस्त्या व झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. २२७ कोटींची ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्याचा निर्णय मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या क क्षात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, प्रा.अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.२०१६ मध्ये अमृत योजना आली. या योजनेच्या माध्यमातून शहरातील सहाही विधानसभा मतदार संघात येणाऱ्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. परंतु महापालिकेने योजनेच्या कामाच्या निविदा काढण्यासाठी दोन वर्ष लावले. ही योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी मजिप्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.महापालिकेने या योजनेच्या कामाचा मूळ प्रस्ताव २८३ कोटींचा तयार केला होता. मात्र मजिप्राने २२६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली. महापालिकेने २०१६ पासून आतापर्यत ६ वेळा निविदा काढल्या. पण मूळ प्रकल्पापेक्षा ३५-४० टक्के ज्यादा दराच्या निविदा आल्या, कंत्राटदाराच्या साखळीत या योजनेच्या कामाच्या निविदा महापालिकेकडे योग्य दरात आल्या नाही. परिणामी या योजनेचे काम करता आले नाही.महापालिकेने काढलेल्या निविदांमध्ये आलेल्या दराची तुलना मजिप्राच्या सध्याच्या दराशी केली असता महापालिकेच्या निविदाची किंमत अधिक होती. यामुळे शासनाची मान्यता मिळाली नाही. २०१५ च्या दरानुसार २२७ कोटी रुपयांचे प्राकलन असलेली ही योजना मंजूर आहे. महापालिकेची ३० ते ४० टक्के ज्यादा दराची निविदा असल्यामुळे ही योजना रखडल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे जाळे नसलेल्या भागाला पाणी मिळू शकले नाही.महापालिकेकडून ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता नसल्याने २२७ कोटींची ही योजना दीड वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश लोणीकर यांनी दिले. मजिप्राने नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजना दोन वर्षात पूर्ण केली.या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. पण अमृत योजना मात्र कंत्राटदारांच्या साखळीत अडकली. परिणामी मजिप्रानेच ही योजना करावी असा निर्णय पालकमंत्री बावनकुळे व आमदारांच्या उपस्थितीत घेण्यात आला. मजिप्राने युध्दपातळीवर योजनेसाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया करावी व काम सुरू करावे. महापालिकेने योजनेसंदर्भात सर्व कागदपत्रे महराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सुपूर्द करण्याचे निर्देशही लोणीकर यांनी दिले.

पेरी अर्बनच्या पाईपलाईनसाठी ३० कोटीपेरी अर्बनमधील पाणीपूरवठा योजनेच्या अतिरिक्त पाईपलाईनसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांनी ३० कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. पालकमंत्री बावनकुळे यांनी केलेल्या मागणीवरून हा निधी मंजूर करण्यात आला. १०३ कि.मी . पाईप लाईनचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही याप्रसंगी देण्यात आले. पेरी अर्बन योजनेतील बचत झालेल्या निधीतून हे काम करण्यात येत आहे. बिडगाव व तरोडी या दोन गावांचा समावेशही पेरी अर्बनमध्ये करण्यात आला.

टॅग्स :Waterपाणी