शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

महाराष्ट्रासह पाच राज्यात 'अमृत भारत'चा भरभरून वर्षाव; सर्वाधिक रेल्वेस्थानकांचा विकास  

By नरेश डोंगरे | Updated: August 5, 2023 19:48 IST

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यात 'अमृत भारत'चा भरभरून वर्षाव केला आहे.

नागपूर : रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यात 'अमृत भारत'चा भरभरून वर्षाव केला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल, हे ते पाच राज्य होय. तुलनेत दिल्ली, उत्तराखंड आणि जम्मू काश्मिरमध्ये मात्र या योजनेबाबत हात आखुडता घेण्यात आला आहे. प्रवाशांसोबत कनेक्टीव्हीटी वाढविण्याच्या उद्देशाने अमृत भारत स्टेशन योजना तयार करण्यात आली असून, त्याच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ६ ऑगस्टला करणार आहेत.

दळणवळणाच्या एकूणच साधन सुविधांपैकी सर्वाधिक पसंतीचे साधन म्हणजे रेल्वेगाडी होय. रोज कोट्यवधी भारतीय रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवास करणारांत सर्वच क्षेत्रातील आणि सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश असतो. त्यातून रेल्वेला कोट्यवधींचे प्रवास भाडेही मिळते. मात्र, बहुतांश रेल्वेस्थानकांवर सुविधांच्या नावावर प्रवाशांना फारसे काही मिळत नाही. बसण्यासाठी फलाटांवर पुरेशी व्यवस्था नसतेच. उभे राहण्यासाठीही जागा कमी पडते. पावसाळ्यात अनेक फलाटांचे शेड प्रवाशांना 'टप टप बरसा पाणी'चा अनुभव देते. स्वच्छतेची मारामार असते. टॉयलेटमध्ये जाण्याचीच ईच्छा होत नाही. वृद्ध, आजारी आणि दिव्यांगांची तर अनेक रेल्वे स्थानकांवर मोठी कुचंबना होते. प्रतिक्षालयाच्या नावाखाली चार कोंदट भिंती बघायला मिळतात. हे झाले आतमधले. 

रेल्वेस्थानकाच्या बाहेर पार्किंगची सोय नसते. पुरेशी जागा नसल्याने येणारे जाणारे प्रवासी, ऑटो आणि ईतर गाड्यां तसेच त्यातून जाणाऱ्या-येणाऱ्यांचा गोंगाट आठवडी बाजाराचा फिल देऊन जातो. या संबंधाने प्रत्येकच मोठ्या महानगरातून रेल्वे अधिकाऱ्यांकडे टोपल्याने तक्रारी येतात. प्रवाशी संघटना, लोकप्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी या तक्रारीचा नियमित पाढा रेल्वे मंत्रालयाकडे आणि रेल्वे बोर्डाकडे वाचतात. त्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने वर्षभरापासून महत्वाकांक्षी 'अमृत भारत स्टेशन' योजनेचे प्रारूप तयार केले. प्रत्येक रेल्वेस्थानकाला प्रशस्त, आकर्षक बणवून प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या मुलभूत सुविधा चांगल्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यावर या योजनेत भर देण्यात आला. त्यासाठी देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा मेकओव्हर करण्याची योजना ठरली. अमृत भारत स्टेशन असे या योजनेला नाव देण्यात आले. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा ५०८ स्थानकांच्या कामांचा शुभारंभ (शिलान्यास) रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. या टप्प्यात रेल्वे मंत्रालयाने राजस्थान,यूपी, बिहार, महाराष्ट्र आणि प. बंगालवर अमृत भारत योजनेचा भरभरून वर्षाव केला आहे. झुकते माप मिळालेल्या राजस्थान आणि उत्तरप्रदेशला प्रत्येकी ५४, बिहार ४९, महाराष्ट्र ४४ आणि प. बंगालमधील ३७ स्थानकांचा कायापालट पहिल्या टप्प्यात होणार आहे. हिमाचल, मेघालयसह चार राज्यात केवळ एकाच स्थानकाची निवडपहिल्या टप्प्यात एकूण २६ प्रांतापैकी उपरोक्त राज्यांसोबतच मध्य प्रदेशमध्ये ३४, आसाम ३२, ओडिशा २५, पंजाब २२ तसेच तेलंगणा आणि गुजरात राज्यातील प्रत्येकी २१ स्थानकांचा विकास होणार आहे. या राज्यांचे ठिकठाक असले तरी दिल्ली (३ स्थानकं), उत्तराखंड (३), जम्मू काश्मिर (३), त्रिपुरा (३) आणि हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालॅण्ड तसेच पॉण्डेचरी या चार राज्यांतील प्रत्येकी केवळ एका रेल्वेस्थानकाच्या विकासाला मंजूरी देऊन रेल्वे मंत्रालयाने आखुडता हात घेतल्याचे दिसून येते.

टॅग्स :nagpurनागपूर