कोरोना रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:48+5:302021-02-13T04:10:48+5:30

नागपूर : कोरोनाच्या अकरा महिन्यातील काळात पहिल्यांदाच दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला मागे टाकले. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यात ३६९, तर ...

Amravati has overtaken Nagpur in the number of corona patients | कोरोना रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला टाकले मागे

कोरोना रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला टाकले मागे

नागपूर : कोरोनाच्या अकरा महिन्यातील काळात पहिल्यांदाच दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला मागे टाकले. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यात ३६९, तर नागपूर जिल्ह्यात ३१९ रुग्णांची नोंद झाली. विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या हजारावर गेली. १०७३ नव्या रुग्णांची भर पडली, तर आठ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या २,८२,२२१, तर मृत्यूची संख्या ७०९८ झाली.

विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ व अकोल्यात रुग्णांची संख्या थोड्या अधिक फरकाने पुन्हा वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्याने आज रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला. ३६९ रुग्ण व तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २४,५१९ झाली असून, मृतांची संख्या ४३१ झाली. नागपूर जिल्ह्यात ३१९ रुग्ण व चार रुग्णांचे मृत्यू झाले. गुरुवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. रुग्णसंख्या १,३७,८१४, तर मृत्यूची संख्या ४२१९ झाली. वर्धा जिल्ह्यात ११३ रुग्ण व एक मृत्यूची नोंद झाली. बाधितांची संख्या १०,६२९, तर मृतांची संख्या ३१८ झाली. अकोला जिल्ह्यात ९० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या १२,१५४ झाली. बुलढाणा जिल्ह्यात ७९ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १४,६१४ झाली. यवतमाळ जिल्ह्यात ५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या १५,००४ झाली. गोंदिया जिल्ह्यात ८, वाशिम जिल्ह्यात ९, चंद्रपूर जिल्ह्यात १६, भंडारा जिल्ह्यात ११ तर गडचिरोली जिल्ह्यात २ रुग्णांची नोंद झाली.

-रुग्णांची एकूण स्थिती

नागपूर- १,३७,८१४

अमरावती-२४,५१९

यवतमाळ-१५,००४

बुलढाणा- १४,६१४

अकोला-१२,१५४

गोंदिया- १४,२८१

वाशिम-७२७५

चंद्रपूर-२३,१९१

भंडारा-१३,३४५

गडचिरोली-९३९५

वर्धा-१०,६२९

Web Title: Amravati has overtaken Nagpur in the number of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.