वासनकर समूहाविरुध्द अमरावतीत गुन्हे

By Admin | Updated: November 9, 2014 00:46 IST2014-11-09T00:46:36+5:302014-11-09T00:46:36+5:30

पैसे दुप्पट करुन देण्याची आमिष दाखवून गुतवणुकदारांची फसवणूकप्रकरणी वासनकर समूहाविरुध्द शनिवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravat Crime against the Vasanankar Group | वासनकर समूहाविरुध्द अमरावतीत गुन्हे

वासनकर समूहाविरुध्द अमरावतीत गुन्हे

अमरावती : पैसे दुप्पट करुन देण्याची आमिष दाखवून गुतवणुकदारांची फसवणूकप्रकरणी वासनकर समूहाविरुध्द शनिवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमरावती पोलीस या आरोपींना प्रोड्युस वारंटवर नागपूरहून ताब्यात घेणार आहे.
स्थानिक पंकज कॉलनीतील रहिवासी संजय शेळके (४५), मनीष गायकवाड व अनंत देशमुख यांनी शनिवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात वासनकर समूहाविरुध्द तक्रार दाखल केली आहे.
नागपूर येथील रहिवासी प्रशांत वासनकर हे वेल्थ मॅनेजमेंटचे संचालक आहेत. त्या अनुषंगाने ते गुतवणुकदारांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करीत होते. विविध योजनेत पैसे भरल्यास रक्कम दुप्पट किंवा तिप्पट करुन देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात येत होते. महिना, तीन महिने व वार्षिक पैसे गुंतवणूकदारांचा यामध्ये सहभाग होता.
जानेवारी २०११ व ८ मार्च २०११ रोजी स्थानिक सांस्कृतिक भवन येथे वासनकर समूहाने सेमिनारचे आयोजन करुन त्यामध्ये गुंतवणूकदारांना योजनाची माहिती देऊन पैसे दुप्पट होण्याचे आमिष दाखविले होते. अनेक गुंतवणूकदारांनी सुमारे २४ लाख १ हजार रुपयांची गुतवणूक या समूहात केली होती. मात्र वासनकर समुहाने दिलेल्या वेळेनंतरही गुतवणुकदारांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी काही गुंतवणूकदारांनी नागपूर येथील अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या फसवणूक प्रकरणाचा संबंध अमरावतीशी असल्यामुळे तीन गुंतवणूकदारांनी शनिवारी सकाळी अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्या तक्रारीच्या आधारे फे्रजरपुरा पोलिसांनी आरोपी विनय वासनकर, प्रशांत वासनकर, भाग्यश्री वासनकर, चंद्रकांत राय, मनोज पांडे, अभिजित चौधरीविरुध्द भादंविच्या कलम ४०९, ४०६, ४२०, १२०, (ब) व ३ एमपीआईडी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी विनय, प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी हे तिघेही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्याकडे देण्यात आला आहे. या आरोपींना अमरावती पोलीस प्रोड्यूस वारंटवर ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली.

Web Title: Amravat Crime against the Vasanankar Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.