संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2023 21:05 IST2023-02-20T21:02:21+5:302023-02-20T21:05:41+5:30

Nagpur News महाराष्ट्रात संवेदनशील आणि मने जुळणारे लेखन फार कमी झाले आहे आणि ज्यांनी असे लेखन केले, त्यात सर्वांत अग्रस्थानी ज्यांचे नाव घ्यायला हवे, त्या आशा बगे असल्याची भावना ज्येष्ठ संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.

Among the few writers who are sensitive and like-minded, Asha Baghe stands at the fore | संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी

ठळक मुद्दे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आशा बगे यांचा सत्कार


नागपूर : महाराष्ट्रात संवेदनशील आणि मने जुळणारे लेखन फार कमी झाले आहे आणि ज्यांनी असे लेखन केले, त्यात सर्वांत अग्रस्थानी ज्यांचे नाव घ्यायला हवे, त्या आशा बगे असल्याची भावना ज्येष्ठ संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.

ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जनस्थान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारानिमित्त विदर्भ गौरव प्रतिष्ठान व आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते, तर व्यासपीठावर हेमंत काळीकर, डॉ. अविनाश रोडे, बाळ कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते.

आशा बगे यांनी पारंपरिकता जपतानाच आधुनिकेतची कास कधीच सोडली नाही. स्वभावाची सात्त्विक, सोज्वळ छाप असलेल्या त्यांच्या लिखाणामध्ये अतिशय समर्पकरीत्या पारंपरिकतेची आधुनिकतेची सांगड घातल्याचे दिसून येते, अशा शब्दांत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी भावना व्यक्त केल्या.

आशाताईंना साहित्य अकादमीनंतर जनस्थान पुरस्कार मिळणे, ही केवळ नागपूरच नाही तर विदर्भाच्या साहित्यिक विश्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे डॉ. गिरीश गांधी अध्यक्षस्थानाहून म्हणाले.

सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले, तर आभार बाळ कुळकर्णी यांनी मानले. प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, डॉ. कुमार शास्त्री, सुनीती देव यांच्यासह साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

लेखिकाच मागे का? - आशा बगे

- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराच्या गेल्या १७ वर्षांच्या काळात केवळ दोन-तीन लेखिकांनाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही लेखिकांना नगण्य स्थान मिळाले आहे. हे असे का? की लेखिकांची दखल घेतली जात नाही? असे प्रश्न आशा बगे यांनी सत्काराला उत्तर देताना यावेळी उपस्थित केले.

 

................

Web Title: Among the few writers who are sensitive and like-minded, Asha Baghe stands at the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.