अंदमानच्या धर्तीवर अंबाझरीत लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो

By Admin | Updated: June 5, 2015 02:33 IST2015-06-05T02:33:43+5:302015-06-05T02:33:43+5:30

अंदमान येथील रॉस आयलॅण्डवर दाखविण्यात येणाऱ्या मल्टी मीडिया लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो च्या धर्तीवर अंबाझरी

Amman Lite and Sound Show | अंदमानच्या धर्तीवर अंबाझरीत लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो

अंदमानच्या धर्तीवर अंबाझरीत लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो

नागपूर : अंदमान येथील रॉस आयलॅण्डवर दाखविण्यात येणाऱ्या मल्टी मीडिया लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो च्या धर्तीवर अंबाझरी उद्यानात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण भारतातील ख्यातनाम अभिनेत्री रेवती यांच्या निर्देशनाखाली हा शो तयार करण्यात येणार आहे.
संबंधित प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येईल. तीन महिन्यांपूर्वी अभिनेत्री रेवती यांनी अंबाझरी उद्यानाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शो साठी लोकेशन निश्चित करीत प्रकल्पासाठी संमती दर्शविली आहे. गुरुवारी त्यांच्या कंपनीच्यावतीने तांत्रिक संचालक शैलेश गोपालन यांनी महापालिकेतील सत्तापक्ष नेते व अधिकाऱ्यांसह अंबाझरी उद्यान व ओव्हर फ्लो पॉर्इंटची पाहणी केली.
शैलेश गोपालन हे देशातील ख्यातनाम ग्राफिक डिझायनर आहेत. कौन बनेगा करोडपती, बिग बॉस, फिल्म फेअर अवॉर्ड, फेमिना मिस इंडिया, नॅशनल गेम्स २०१५ आदी कार्यक्रमांचे लाईट, साऊंड तसेच ग्राफिक्सचे संयोजन त्यांनी केले आहे. अंदमान येथील रॉस आयलॅण्डवर सुरू असलेल्या लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो चे व्हिडिओ ग्राफिक्सही त्यांनी केले आहे. अंबाझरीत साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात गोपालन यांनी दयाशंकर तिवारी व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या दौऱ्यानंतर आता महापालिका प्रकल्पाचे विस्तृत प्राकलन तयार करेल. (प्रतिनिधी)

 

Web Title: Amman Lite and Sound Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.