शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:50 AM

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी ते सभास्थळी येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देउपराजधानीत आगमन : गडकरींनी दिली सभास्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी ते सभास्थळी येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.अमित शहा यांनी रविवार ४ मार्च रोजी संघ मुख्यालयात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली होती. सभेच्या अगोदर शहा यांनी संघ पदाधिकाऱ्यांजवळ भाजपचे प्रतिनिधी म्हणून काही अपेक्षा व पुढील तीन वर्षांसाठीच्या योजनेचे प्रारुप यावेळी मांडले होते. त्रिपुरातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असल्याने ते सभेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत. रात्री ९.१५ च्या सुमारास त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते थेट रविभवनला रवाना झाले.गडकरींनी घेतली संघ पदाधिकाऱ्यांची भेटकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी रात्री ९.४५ च्या सुमारास सभास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शनिवारी सरकार्यवाहांची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.शहा-तोगडिया येणार आमनेसामने ?गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया हेदेखील सभेत सहभागी झाले आहेत. तोगडिया यांनी अप्रत्यक्षपणे शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. शनिवारी अमित शहा व प्रवीण तोगडिया हे दोघेही सभेच्या निमित्ताने आमनेसामने येण्याची शक्यता आहे.कडेकोट सुरक्षा व्यवस्थाएरवी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ‘व्हीव्हीआयपी’ व ‘व्हीआयपी’ पाहुण्यांची वर्दळ असते. परंतु अमित शहा येणार म्हणून विमानतळ ते रेशीमबागपर्यंतच्या रस्त्यांवर जागोजागी पोलीस बंदोबस्त दिसून येत होता. रेशीमबाग मैदान परिसरातदेखील प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मैदानावरदेखील सुरक्षा व्यवस्था होती. परंतु रविभवनकडे शहा गेल्याची माहिती कळताच सुरक्षा काहीशी शिथिल करण्यात आली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ