शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विमा रुग्णालयाची रुग्णवाहिकाही थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:18 IST

कामगार विमा रुग्णालयामधील समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्या वाढतच चालल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. ५० टक्क्यांहून जास्त रिक्त पदे, दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा तर आता रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाल्याने रुग्णवाहिकाही थांबल्याने शासनाचा उदासीनपणा दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामगार विमा रुग्णालयामधील समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्या वाढतच चालल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. ५० टक्क्यांहून जास्त रिक्त पदे, दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा तर आता रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाल्याने रुग्णवाहिकाही थांबल्याने शासनाचा उदासीनपणा दिसून येत आहे.नागपूरचे कामगार रुग्णालय विदर्भातील कामगार रुग्णांसाठी एकमेव आधार आहे. या रुग्णालयात २०० खाटा आहेत. रोज बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ४५० ते ५०० रुग्णांवर उपचार होतात. रुग्णालयात आवश्यक सोयी व तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने बहुसंख्य गंभीर रुग्णांना तातडीने मेडिकलसह खासगी रुग्णलयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका होती. ही रुग्णवाहिका साधारण १० वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या निधीतून मिळाली होती. रुग्णांसाठी सोयीचे झाले होते. मात्र ३१ मे २०१८ रोजी या रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाला. त्यामुळे मागील १० दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबलेली आहेत. रुग्णालय प्रशासनाने चालकाची सेवानिवृत्ती लक्षात घेऊन त्यापूर्वी कंत्राटी चालक नेमणे आवश्यक होते, परंतु वरिष्ठांकडून त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाला स्वत:जवळील पैसे खर्चून ‘रेफर’ केलेल्या रुग्णालयात जावे लागत आहे. आधीच गरीब व सर्वसामान्य कामगार असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीHealthआरोग्य