आंबेडकर जयंतीला कस्तूरचंद पार्कवर सोहळा
By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:46+5:302015-04-09T02:56:46+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांसाठी योगदान दिले.

आंबेडकर जयंतीला कस्तूरचंद पार्कवर सोहळा
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांसाठी योगदान दिले. त्यामुळे दलित, आदिवासी, ओबीसी, बौद्ध, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन आदी सर्व धर्माच्या लोकांतर्फे १४ एप्रिलला दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कस्तुरचंद पार्कवर साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. कृष्णा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कस्तुरचंद पार्कवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. रामास्वामी, भावना इलपाची, बिशप अंबाला, इकबालसिंग सल्होत्रा, मौलाना रिजवी, डॉ. एस. एन. बुसी, प्रकाश निमजे यांची उपस्थिती राहील.
दुपारी ४ ते ५.३० दरम्यान सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी ५.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. मनीष पाटील, प्रज्ञा सालवटकर, क्रांती आगलावे, अजय गजभिये, सम्राट अशोक परिश्रम घेत आहेत.
कार्यक्रमाला सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सुनील तलवारे, ज्ञानेश्वर रक्षक, डॉ. सुचित बागडे, डॉ. नीरज बोधी, अमन कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)