आंबेडकर महाविद्यालय ‘सील’, परीक्षा केंद्रात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:32+5:302021-02-24T04:09:32+5:30

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला ‘कोरोना’चा फटका बसला आहे. महाविद्यालयातील १६ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला असल्याने ...

Ambedkar College 'Seal', change in examination center | आंबेडकर महाविद्यालय ‘सील’, परीक्षा केंद्रात बदल

आंबेडकर महाविद्यालय ‘सील’, परीक्षा केंद्रात बदल

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला ‘कोरोना’चा फटका बसला आहे. महाविद्यालयातील १६ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला असल्याने मनपाने महाविद्यालयाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करत ‘सील’ केले आहे. दरम्यान, ‘बीएड’च्या परीक्षेसाठी ऐनवेळी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला असून, संस्थेच्या विधी महाविद्यालय परिसरात परीक्षा घेण्यात येणार आहे.

१५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयात वर्ग सुरू झाले होते. त्यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची ‘कोरोना’ चाचणी करण्यात आली. यात बरेच जण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले. त्यामुळे, प्राध्यापक आणि कर्मचारी यांना कॉलेजमध्ये येण्यास कॉलेज प्रशासनाने मनाई केली आहे. शिवाय नागपूर महापालिकेने महाविद्यालयाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्यासंदर्भातील फलकदेखील लावण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन होतील व प्राध्यापकदेखील घरूनच वर्ग घेतील. बीएडच्या परीक्षार्थ्यांसंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा करण्यात आली. महाविद्यालयातील एका प्रवेशद्वारातून प्रवेश बंद आहे. मात्र, संस्थेचीच एक इमारत दुसऱ्या बाजूला आहे. तेथे कुठलाही संसर्ग नाही. त्यामुळे तेथे संबंधित परीक्षा घेण्यात येईल, असे महाविद्यालय प्रशासनाने कळविल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Ambedkar College 'Seal', change in examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.