शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आमला रनिंग रुम ठरली देशभरातून अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:58 IST

रनिंग रुम म्हणजे लोकोपायलट, सहायक लोको पायलट आणि गार्ड यांना विश्रांती करण्याचे ठिकाण. रेल्वेगाडी दक्ष राहून चालविता यावी यासाठी रनिंग रुममध्ये लोकोपायलटची चांगली विश्रांती झाली पाहिजे. त्यासाठी रनिंग रुममध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून रुमची देखभाल करण्यात येते. रेल्वेने केलेल्या पाहणीत नागपूर विभागातील आमला येथील रनिंग रुम अव्वल ठरली. त्यासाठी आमला रनिंग रुमला बेस्ट रनिंग रुम शिल्ड प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्दे‘बेस्ट रनिंग रुम शील्ड’देऊन गौरव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रनिंग रुम म्हणजे लोकोपायलट, सहायक लोको पायलट आणि गार्ड यांना विश्रांती करण्याचे ठिकाण. रेल्वेगाडी दक्ष राहून चालविता यावी यासाठी रनिंग रुममध्ये लोकोपायलटची चांगली विश्रांती झाली पाहिजे. त्यासाठी रनिंग रुममध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून रुमची देखभाल करण्यात येते. रेल्वेने केलेल्या पाहणीत नागपूर विभागातील आमला येथील रनिंग रुम अव्वल ठरली. त्यासाठी आमला रनिंग रुमला बेस्ट रनिंग रुम शिल्ड प्रदान करण्यात आली.मुंबईत झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार वितरण समारंभात ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांच्या हस्ते शिल्ड स्वीकारली. भारतीय रेल्वेत केवळ मध्य रेल्वेला एक शिल्ड देण्यात आली. आमला रनिंग रुममध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लोकोपायलटला घराबाहेर घर असल्याचा अनुभव येतो. यात सेपरेट रिडींग लॅम्प, फुट लॅम्प लावण्यात आले आहेत. भोजनाच्या दर्जावर विशेष लक्ष पुरविण्यात येते. मनोरंजनासाठी पुस्तके, विविध पत्रिका, इन डोअर गेमची व्यवस्था आहे. व्यायामासाठी हिरव्यागार लॉनमध्ये ओपन जीमची व्यवस्था आहे. ध्यानसाधनेसाठी इन डोअर रुम आणि ध्यानकुटीची व्यवस्था आहे. या सर्व सुविधा रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार आहेत की नाही याची पाहणी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक स्तरावरील समितीतर्फे करण्यात येते. ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांनी वरिष्ठ विद्युत अभियंता महेश कुमार आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले आहे. ‘डीआरएम’ सोमेश कुमार हे मुंबईवरून शिल्ड घेऊन आल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर