शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मी खलनायक आहे काय? श्रीपाद जोशी यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 10:08 PM

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंमेलनावर बहिष्कार न घालण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.आयोजकांच्या अडचणी लक्षात घेत यवतमाळचे साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी माझा प्रयत्न होता. मात्र मसुदा लिहून दिला आणि मीच खलनायक ठरलो. महामंडळ हे पळपुट्यांचा अड्डा आहे असे कथानक रंगवल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी भाषा, संस्कृतीची इतकी अवहेलना होत आहे हे दु:खदायक व क्लेशदायक आहे म्हणून राजीनामा दिल्याचे जोशी यावेळी बोलले. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याने धमकी दिली आणि हे नाहक नाट्य निर्माण केले. मात्र राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली ही मोठी बाब असल्याचे सांगत राजीनामा देण्यामागे त्यांचीही प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. मी डाव्या किंवा उजव्या कुठलाही विचारसरणीचा नाही. नयनतारा सहगल या उच्च कोटीच्या लेखिका आहेत. त्यांच्याबद्दल गैरसमज करून वाद उभा करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणाऱ्या साहित्यिक मित्रांची भूमिका योग्य आहे आणि मी पदावर नसतो तर मी सुद्धा त्यांच्या सोबत असतो. असे असले तरी संमेलनावर बहिष्कार घालू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नयनतारा यांना भेटणारसंमेलनात सहभागी होणार की नाही, यावर सरळ उत्तर देणे त्यांनी टाळले. एक सामान्य प्रतिनिधी म्हणून सहभागी होईल, असे ते म्हणाले. दरम्यान या सगळ्या वादविवादामुळे प्रज्ञावंत लेखिका नयनतारा सहगल यांच्या भावना दुखावल्या असतील तसेच त्यांच्या न येण्याने जे दुखावले असतील त्यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आयोजकांनी सौजन्य दाखविले नसले तरी मी डेहरादूनला जाऊन सहगल यांची माफी मागणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ