शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोकरिता अ‍ॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:26 IST

पुणे मेट्रोकरिता अ‍ॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार असून, भारतीय स्वामित्वाची कंपनी टीटागढ फिरेमा मेट्रो कोचेस तयार करणार आहे. त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल.

ठळक मुद्देमेक इन इंडियाला चालना : टीटागढ फिरेमा तयार करणार कोचेस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुणेमेट्रोकरिता अ‍ॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार असून, भारतीय स्वामित्वाची कंपनी टीटागढ फिरेमा मेट्रो कोचेस तयार करणार आहे. त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल.पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मेट्रो रेल्वेची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात भारतीय स्वामित्व असलेली कंपनी टीटागढ फिरेमाला कंत्राट मिळाले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला एकूण १०२ कोचेसची आवश्यकता आहे. त्यापैकी २५ टक्के कोचेस इटली तर उर्वरित ७५ टक्के कोचेस नागपूर येथील महामेट्रोच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पात तयार होतील. अशा कोचेस भारतात पहिल्यांदाच तयार केल्या जातील. आतापर्यंत स्टेनलेस स्टील बॉडीचे कोचेस भारतातील विविध मेट्रो रेल्वे प्रकल्पात वापरले जातात. पण पहिल्यांदाच अ‍ॅल्युमिनियम बॉडीचे कोचेस पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात वापरल्या जाणार आहे. हे कोचेस स्टेनलेस बॉडी कोचच्या तुलनेत हलके, अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि सुंदर असतील. आधुनिक पद्धतीची कोच निर्मिती भारतातील मेट्रोकरिता बदल घडविणारी असेल. या बदलांसाठी केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी  ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.प्रारंभी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात रेल्वे तीन कोचची राहणार आहे. आवश्यकतेनुसार सहा कोचपर्यंत वाढविण्यात येईल. कोच पूर्णपणे वातानुकूलित, डिजिटल डिस्प्ले, १०० टक्के सीसीटीव्हीने उपयुक्त आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपात्कालीन बटन राहतील. आवश्यक भासल्यास प्रवासी ट्रेनमध्ये ऑपरेटरशी तसेच ओसीसीच्या आपत्कालीन नियंत्रणाशी बोलू शकतील. शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवासी प्रवास करू शकतील. मोबाईल व लॅपटॉप चार्जिंगची सुविधा राहणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोचेसच्या आतील व बाह्यभागात डिझाईन केले जाईल. कमाल वेग ९५ कि.मी. प्रति तास आणि एकाच वेळी ९२५ जण प्रवास करतील. मेट्रो कोचेस ऊर्जा कार्यक्षम तसेच ब्रेकिंग सिस्टमदरम्यान रिव्हर्स ऊर्जा तयार करू शकेल.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणेnagpurनागपूर