शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

९८८६ वीज कनेक्शन कापले तरी २८६ कोटीची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणने मागील काही महिन्यांपासून थकबाकीदारांविरुद्ध वसुली मोहीम तीव्र केली. एकट्या जुलै महिन्यात ९,८८६ वीज ...

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणने मागील काही महिन्यांपासून थकबाकीदारांविरुद्ध वसुली मोहीम तीव्र केली. एकट्या जुलै महिन्यात ९,८८६ वीज कनेक्शन कापले. ५८४२ लोकांनी बिल भरून वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला; परंतु अजूनही नागपुरातील साडेचार लाखापेक्षा अधिक ग्राहकांवर २८६.८६ कोटी रुपयाची थकबाकी शिल्लक आहे. ही संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट महिन्यात वीज कनेक्शन कापण्याची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्यात महावितरणचे दोन सर्कल आहेत. अर्बन (शहर) सर्कलमध्ये नागपूर शहरासह बुटीबोरी व हिंगण्याचा समावेश होतो. तर जिल्ह्यातील उर्वरित भागाचा समावेश ग्रामीण सर्कलमध्ये होतो. जुलै महिन्यात शहर सर्कलमध्ये ६६०४ व ग्रामीण भागात ३२८२ वीज कनेक्शन कापण्यात आले. राजकीय पक्षांनी याचा विरोध केला. आंदोलनेसुद्धा झाली. तरीही महावितरणने आर्थिक परिस्थिती पाहता मोहीम सुरू ठेवली. कंपनीचे म्हणणे आहे की, नागरिकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. त्यामुळे थकबाकी वसुली करणे गरजेचे आहे. दुसरीकडे नागरिकांचे म्हणणे आहे की, कोविड संकटामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळायला हवा. दरम्यान, थकबाकी वाढत चालली आहे. नागपूर शहर सर्कलचा विचार केला तर मार्च महिन्याची थकबाकी १७९ कोटी इतकी होती. यात ६९.२१ कोटीची आणखी वाढ झाली. वसुली माेहीम जोरात सुरू असतानाची ही परिस्थिती आहे. त्यामुळे महावितरणच्या सूत्रानुसार ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या थकबाकीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

बॉक्स

- ग्राहकांनी बिल भरून सहकार्य करावे

ग्राहकांना चांगली सेवा तेव्हाच देता येईल जेव्हा बिल वेळोवेळी भरले जाईल. त्यामुळे पूर्ण राज्यात वसुली माेहीम सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांनी बिल भरून कंपनीला सहकार्य करावे.

दिलीप दोडके, मुख्य अभियंता, महावितरण.

बॉक्स

शहरातील परिस्थिती

डिव्हीजन मार्चनंतरची थकबाकी मार्चपर्यंतची थकबाकी

ग्राहक - रक्कम ग्राहक - रक्कम

एमआयडीसी २८,७७२ - ४.२२ १७४३५- ८.६३

सिव्हिल लाइन्स ८१,७४६ - २१.९४ ८७,५६८ - ६४.६४

काँग्रेस नगर ५७,००९ - ९.६७ ४१,४७५ - १७.९२

महाल १,०८,४४५ - २०.०१ १,१२,१९३ - ५२.८

गांधीबाग ६१,०२७ - १३.३७ ५६,५४२ - ३५.६८

--------------------------------------------------------------------------------------

एकूण ३,४६,९९९ - ६९.२१ ३,१५,२१३ - १७९.६७

नोट : रक्कम कोटीमध्ये आहे. ही एकूण ग्राहकांची परिस्थिती आहे.