लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर सुधार प्रन्यासने आगामी वर्षात शहरातील अविकसित ले- आउटमध्ये २०५ कोटींची विकासकामे आणि शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंट रस्ते बांधण्यासाठी ६० कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प केला आहे. खेळाच्या मैदानाच्या विकासावर १५० कोटींचा खर्च करणार असून स्पोर्ट पार्कची निर्मिती करणार आहे. वाठोडा येथे ३०० बेडचे हॉस्पिटल, गोकुळपेठ मार्केट, अंबाझरी संकुलासह जलतरण तलाव, क्रीडा संकुलांसाठी मोठी तरतूद करून नागपूरच्या पायाभूत गती देण्याचा संकल्प नासुप्रच्या अर्थसंकल्पात केला आहे. नासुप्र कार्यालयात विश्वस्त मंडळाची अर्थसंकल्पीय सभा मंगळवारी पार पडली.
सभेत सभापती तथा नामप्रविप्राचे आयुक्त संजय मीना यांनी नासुप्रचा २०२५-२६ या वर्षाचा १५०७. ७९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विश्वस्त संदीप इटकेलवार, नगररचना विभागाचे सहसंचालक विजय शेंडे, नासुप्रचे अधीक्षक अभियंता प्रशात भांडारकर, कार्यकारी अधिकारी अविनाश बडगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे, जनसंपर्क अधिकारी अविनाश गंधे आदी उपस्थित होते. विश्वस्त मंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.
सर्वांगीण विकास साधला जाणारअर्थसंकल्पात तसेच गृहबांधणी, टेकडी गणेश मंदिर, वारकरी भवन आणि शिवसृष्टी प्रकल्पाला गती देण्याचा संकल्प केला आहे. यामुळे नागपूर शहराचा सर्वांगीण विकास साथला जाणार आहे.
असे आहेत महत्त्वाचे शासकीय विकास प्रकल्प
- टेकडी गणेश मंदिर विकास
- वाठोडा येथे ३०० बेड्सचे हॉस्पिटल
- सीताबर्डी येथे महाज्योती संस्थेची इमारत
- तिरळे कुणबी भवन, खैरे कुणबी भवनाचे बांधकाम.
- हरपूर येथे क्रीडा संकुलाचा विकास करणे,
- गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या समाधी स्थळाचा विकास
- छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल व सभागृह बांधकाम.
- संत सावता महाराज सांस्कृतिक भवन.
- ओबीसी भवनाचे बांधकाम.
- क्रीडा संकुल व वारकरी भवन निर्मिती
- शिवाजी महाराजांच्या जीवनावर
- आधारित प्रसंग दर्शविणारा शिवसृष्टी प्रकल्प.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्काम केलेल्या श्याम हॉटेलचे जतन व संवर्धन.
- ई-लायब्ररी, विज्ञान केंद्र आणि फुल मार्केटचा विकास
- दक्षिण नागपूर येथे कार पार्किंग सुविधा.
मुख्य विकास प्रकल्प आणि योजनांसाठी तरतूद (कोटी)
- गुंठेवारी विकास व मूलभूत सुविधा-२०५
- रस्ते व पायाभूत सुविधा विकास- ७०
- दलित वस्ती, आमदार, खासदार निधी व इतर
- विकास योजना - ७९१.२६
- खेळाची मैदाने आणि स्पोर्ट्स पार्क विकास-१५०
- पूर्व नागपूर जलतरण तलाव - २०
- आहुजा नगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स - १५
अंदाजपत्रकाचा आढावा (कोटींत)
- एकूण अपेक्षित जमा - १५०७.७९
- भांडवली जमा - ९७५.१७
- महसुली जमा - २०९.९१
- अग्रिम व ठेवी जमा - ७०.६५
- एकूण खर्च - १४०५.१३
- भांडवली खर्च - ११६४.९८
- महसुली खर्च - १४८,००
- अग्रिम व ठेवी खर्च - ९२.१५