युती, आघाडी तोडण्यामागे शरद पवार -राज ठाकरे

By Admin | Updated: October 1, 2014 12:55 IST2014-10-01T12:41:07+5:302014-10-01T12:55:03+5:30

अनेक वर्षांपासून एकत्र असणारी युती आणि आघाडी तोडण्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

Alliance, Sharad Pawar-Raj Thackeray | युती, आघाडी तोडण्यामागे शरद पवार -राज ठाकरे

युती, आघाडी तोडण्यामागे शरद पवार -राज ठाकरे

 ऑनलाइन लोकमत

वणी, दि. १ - अनेक वर्षांपासून एकत्र असणारी युती आणि आघाडी  तोडण्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. वणी येथील सभेत ते बोलत होते.

युती तोडल्यास काही वेळातच आघाडीही तोडतो असे शरद पवारांनी भाजपा नेत्यांना फोनवरून  सांगितल्यानेच इतके वर्ष अभेद्य असलेली युती संपुष्टात आली असे राज ठाकरे यांनी सांगितले. आत्ता वेगवेगळे लढणा-या पक्षांचे, सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांशी सेंटिग असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यातील विरोधी पक्ष नाकाम असून त्यांच्या अपयशामुळेच गेल्या १५ वर्षांपासून आघाडी सरकार सत्तेवर असल्याचेही ते म्हणाले.

मी शेतक-यांचा मुलगा आहे, मला निवडून द्या असे सांगणा-या या नेत्यांना महाराष्ट्रातील शेतक-यांची दु:ख का दिसत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत, जनता पाण्याच्या अभावी कष्टी आहे, असे असताना त्यांची मदत करण्याचे सोडून अजित पवारांसारखा नेता त्यांची खिल्ली उडवतो, ही चीड आणणारी बाब असल्याचे सांगत अशा नेत्यांना निवडून देण्याचे काम जनताच करत आहे, असे ते म्हणाले. 

यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावरही टीका केली. सध्या नवरात सुरू आहे, थोड्याच दिवसांनंतर दिवाळी आहे, निवडणूक आयोगाला राज्यात निवडणूक घेण्यासाठी हेच दिवस मिळाले का? असा सवाल त्यांनी केला. हीच परिस्थिती जर पश्चिम बंगालमध्ये असती तर तेथील सर्व पक्षांनी सणासुदीच्या दिवसांत निवडणूक घेण्यास ठाम विरोध केला असता, मात्र आपल्या राजकारण्यांना कसलीही पर्वा नाही, असेही ते म्हणाले. 

 

Web Title: Alliance, Sharad Pawar-Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.