घरातील धुळीमुळे अ‍ॅलर्जीक अस्थमा

By Admin | Updated: May 5, 2015 02:03 IST2015-05-05T02:03:30+5:302015-05-05T02:03:30+5:30

वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२० साली भारत ही अस्थमा रु ग्णांची जागतिक राजधानी बनेल,

Allergic asthma due to indoor dirt | घरातील धुळीमुळे अ‍ॅलर्जीक अस्थमा

घरातील धुळीमुळे अ‍ॅलर्जीक अस्थमा

नागपूर : वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२० साली भारत ही अस्थमा रु ग्णांची जागतिक राजधानी बनेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या आजाराला अनेक धोकादायक घटक कारणीभूत असलेतरी एका निरीक्षणात घरातील धूळ हे सुद्धा यासाठी कारण ठरले आहे. यावर नागपुरातील एका खासगी इस्पितळाने १५४ रुग्णांची अ‍ॅलर्जीची चाचणी केली असता यात ७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यापैकी ५३ म्हणजे ३४ टक्के रुग्णांना घरातील धुळीमुळे अ‍ॅलर्जीक अस्थमा आढळून आला. याला घरातील गादी, कार्पेटवरील धूळ, मांजराचे केस व कीडे कारणीभूत आहे.
अस्थमा म्हणजे काय?
४ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूळ, धुराच्या संपर्कात येताच ती आकुंचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येते. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही, यालाच अस्थमा (दमा) म्हणतात.
अस्थमाचे निदान
४दमा मोजण्यासाठी ‘पीक एक्सपीरेटरी फ्लो रेट’चा उपयोग केला जातो. आता यात ‘स्पायरोमीटर’ही आले आहे. पीक फ्लो रेट कमी आल्यास ‘लंग फंक्शन टेस्ट’ केले जाते. त्यानंतर आवश्यक औषधोपचार केले जातात. दैनंदिन जीवनात दम्याच्या रुग्णाला कुठेही समस्या येऊ नये म्हणून योग्य औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. विशेषत: विद्यार्थ्यांवर योग्य वेळी उपचार करून घेणे त्याच्या पुढील भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक अस्थमाचे रुग्ण नियमित औषधोपचार करीत नाही. यामुळे पुढे हा आजार वाढतो. जीवघेणा अटॅक येऊ शकतो. आजारावरील खर्चही वाढतो. म्हणून नियमित तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार आवश्यक आहे.

Web Title: Allergic asthma due to indoor dirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.