लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प गोरेवाडा येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवरच राज्यातील सर्वच धरणांमध्ये तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यशवंत स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.राज्यात विद्युत निर्मितीला मोठा तोटा होत असून हा तोटा कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा तोटा तोपर्यंत नियंत्रणात येणे आवश्यक आहे. असे झाले तरच राज्य खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर जाईल. विद्युत निर्मितीतून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सौरऊर्जा निर्मिती हा एक उत्तम पर्याय आहे, असे बावनकुळे म्हणाले. चंद्रपुरातील इराई धरण आणि उजनी धरणावर असे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी काळात कचऱ्यापासूनदेखील ऊर्जानिर्मिती करण्याचा मानस असून ‘डम्पिंग यार्ड’च्या ठिकाणी त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण नागपूर शहरात २४ बाय ७ पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेदेखील बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यातील सर्वच धरणात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:59 IST
देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प गोरेवाडा येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवरच राज्यातील सर्वच धरणांमध्ये तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यशवंत स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील सर्वच धरणात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला मानस : सौरऊर्जेतून दूर होईल विद्युत ऊर्जेचे नुकसान