शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी खंडांचा होणार मराठीत अनुवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 10:13 AM

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली.

ठळक मुद्देप्रकाशन समिती चार टप्प्यांवर करणार काम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली.

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लोकमतने बुधवारी त्यांच्याशी विशेष संवाद साधला. तेव्हा त्यांनी यासंदर्भात मनमोकळी चर्चा केली. डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले की, बाबासाहेबांचे विचारधन हे देशाला दिशा देणारे आहे. त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त विचारधन हे पुस्तक रूपाने लोकांपर्यंत यावे, यासाठी चरित्र साधने समिती कार्यरत आहे. मी नुकताच अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. एकूणच चार टप्प्यांवर काम करण्यावर आम्हाला काम करावे लागणार आहे. त्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. सर्वात प्रथम म्हणजे बाबासाहेबांच्या सर्व प्रकाशित इंग्रजी खंडांचे मराठी भाषेत अनुवाद करून ते नव्याने प्रकाशित करायचे. यासोबतच आजवरच्या सर्व अनुवादित साहित्याचे पुनर्मुद्रण करणे, तसेच बाबासाहेबांचे नव-नवीन साहित्य शोधणे व त्याचे प्रकाशन करणे होय. याशिवाय सोर्स मटेरियल अंतर्गत ‘जनता’ या पाक्षिकांचे खंड प्रकाशित करण्यात येतील. चार टप्प्यांतील ही कामे वाटतात तितकी सोपी नाहीत; परंतु योग्य नियोजन करून ही सर्व कामे समिती पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘रुट्स ऑफ रिव्होलेशन’ लवकरच प्रकाशित होणार

सोर्स मटेरियल अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रुट्स ऑफ रिव्होलेशन’ हा खंड लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. तब्बल ७०० पानांचा हा खंड असून, त्याचे जवळपास सर्व काम झाले आहे. येत्या काही दिवसात हा खंड लोकांपर्यंत उपलब्ध होईल.

मुंबईलाच राहून काम करणार

बाबासाहेबांच्या साहित्याच्या प्रकाशनाचे काम खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेण्यासाठी समितीच्या अध्यक्षांनी पूर्णवेळ मुंबईला राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मुंबईलाच पूर्णवेळ राहण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एक-दोन दिवस नागपूरला येत-जात राहू; परंतु मुंबईलाच राहून समितीचे पूर्ण काम करण्यात येईल.

- डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर