विषबाधेवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:34 PM2019-08-14T22:34:37+5:302019-08-14T22:36:12+5:30

प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीच्या माध्यमातून विषबाधा रोखण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.

Alert system for controlling poisoning | विषबाधेवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सतर्क

विषबाधेवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सतर्क

Next
ठळक मुद्देप्रचार प्रसिद्धीबरोबरच समित्यांचेही गठन : कृषी केंद्रावर विभागाचा जास्त फोकस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१७ मध्ये कीटकनाशकाच्या फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अख्खी यंत्रणात हादरली होती. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला होता. सरकारवर ताशेरे ओढले गेले होते. प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीच्या माध्यमातून विषबाधा रोखण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुका, गावपातळीवर समित्यांचे गठन करण्यात आले असून, कृषीकेंद्र संचालकांना जिल्हा व तालुका पातळीवर प्रशिक्षण दिले जात आहे.
कृषी विभागाने २०१७ मध्ये झालेल्या विषबाधेची कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली होती. त्यातून काही निष्कर्ष पुढे आले होते. शेतकऱ्यांचे अज्ञान, जनजागृतीचा अभाव, चुकीची फवारणी, सुरक्षेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष अनेक कारणे पुढे आली होती. यावर्षी खरीपाच्या बहुतांश पेरण्या आटोपल्या आहे. पीक शेतात उभी झाली आहे. आता शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाची मागणी होणार आहे. हीच वेळ शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची असल्याने कृषी विभागाने आता पथकच तयार केले आहे. तालुका कृषी अधिकारी, पं.स.कृषी अधिकारी, खते-बियाणे-कीटकनाशक निरीक्षकांचे पथक तयार करून गावामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कृषी केंद्र संचालकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कीटकनाशक वापरण्यासंदर्भात नियमावली, काळजी घेण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे. बोंड अळीचे व्यवस्थापन आणि विषबाधा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे फ्लेक्स, पत्रक कृषी केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येत आहे. गावस्तरावर, तालुकास्तरावर सभा घेऊन कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. विषबाधेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कीटकनाशक आणि बियाणे कंपन्यांची नियुक्ती केली आहे. या कंपन्या सीएसआर फंडातून शेतकऱ्यांना फवारणी कीट, फोरोमन ट्रॅप उपलब्ध करून देणार आहे. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांची गावपातळीवर समिती तयार करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी गावोगावी होणाऱ्या ग्रामसभेत विषबाधा निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांचे वाचन होणार आहे.

कीटकनाशक म्हणजे एकप्रकारचे विष. शेतकरी जेथून कीटकनाशक नेतात, त्या
कृ षी केंद्रावर आम्ही फोकस केले आहे. त्यांच्याकडूनच जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नियमावली, अटी शर्तीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. त्याचा चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.

प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी, जि.प.

Web Title: Alert system for controlling poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.