शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याआधी अलर्ट ! १०० अग्निशमन जवानांची तातडीने भरती; लोकमतच्या बातमीचा परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:31 IST

आयुक्तांचे निर्देश: १०० प्रशिक्षणार्थीची पावसाळ्याच्या ४ महिन्यांसाठी भरती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यात आपत्तीचा निटारा करण्यासाठी, पूर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १०० प्रशिक्षित अग्निशमन विमोचक यांची भरती ७ दिवसांत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील फाइल १५ दिवसांपासून रखडली होती. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी तत्काळ फाइल बोलावून मंजुरी दिली व ७ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सामान्य प्रशासन विभागाला भरतीचे अधिकार दिले आहे. त्यामुळे विभाग किती लवकर ही प्रक्रिया पूर्ण करते हे बघावे लागेल.

महापालिकेत १२ केंद्रांसाठी ८०७ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत १२६ कर्मचारी व अधिकारीच कार्यरत आहे. मदतीसाठी ५५ कंत्राटी कर्मचारी व कळमना प्रशिक्षण केंद्रावर ४५ प्रशिक्षणार्थीच्या भरोशावर आपत्ती व्यवस्थापन विभाग काम करीत आहे. ७ पटीने कमी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर अग्निशमन विभाग काम करीत आहे. त्याच कारणाने पावसाळ्याच्या तोंडावर ४ महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी अग्निशामक विमोचकांची भरतीचा निर्णय सरकारच्या नियमानुसार घेण्यात आला होता.

तर गरज पडली नसती प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची३५० पर्दाच्या भरतीची फाइल महिला उमेदवारांची उंची व वजनाच्या कारणाने नगरविकास विभागाकडे गेल्या ९ महिन्यांपासून पडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शहर असतानाही नगरविकास विभागाच्या दुर्लक्षामुळे ही पदभरती रखडलेली आहे. या पदांची जर वेळेत भरती झाली असती, तर प्रशिक्षणार्थीची भरती करणाची गरज पडली नसती. महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या कमकुवतपणासाठी राजकीय किंवा प्रशासकीय पोहोच कमी पडत आहे. पावसाळ्यात जर कुठलीही आपत्ती शहरावर आल्यास लोकं अडचणीत अडकल्यास येणाऱ्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून येईल.

टॅग्स :nagpurनागपूर