शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात दारू बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 00:54 IST

लॉकडाऊनदरम्यान काही भागांना सवलत देण्यात आली असली तरी संपूर्ण नागपुरात दारू बंदच राहणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच नागपूर शहरात दारूबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनीसुद्धा संपूर्ण नागपूर जिल्ह्यात दारू बंद राहणार असल्याचा आदेश जारी केला आहे.

ठळक मुद्दे रेस्टॉरंट व पानठेलेही बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनदरम्यान काही भागांना सवलत देण्यात आली असली तरी संपूर्ण नागपुरात दारू बंदच राहणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच नागपूर शहरात दारूबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनीसुद्धा संपूर्ण नागपूर जिल्ह्यात दारू बंद राहणार असल्याचा आदेश जारी केला आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज सोमवारी जारी केलेल्या आदेशात दारू दुकानासोबतच सर्व बीअर शॉपी, परमिट बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूचे दुकान, सर्व रेस्टॉरंट व पानठेलेसुद्धा बंद ठेवण्यात यावे, असे स्पष्टपणे म्हटले आहे.विमानतळ, रेल्वेस्थानक व बसस्थानकातील उपाहारगृह राहणार सुरूजिल्हाधिकारी ठाकरे यांनी जारी केलेल्या या आदेशानुसार नागपूर विमानतळ, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकाच्या आतील इटींग हाऊस मात्र बंदीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे ती सुरू राहतील.

राज्य व परराज्यातील परवानगीबाबत बुधवारपासून निर्णय कळवणार

राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यात प्रवासाच्या परवानगीसाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले त्याच्या परवानगीबाबत येत्या ६ मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई-पास संदर्भात २ मेनंतरच्या अजार्बाबत ८ मेपासून निर्णय घेण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती देत याबाबत पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्यासाठी आहे त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यानंतरच परवानगी देण्यात येईल, असेही स्पष्ट केले.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, परवानगी मिळण्याबाबतच्या अर्जामध्ये ४,४९० अर्ज शासनाने वाहन व्यवस्था करावी याबाबतचे आहेत. रेल्वेची व्यवस्था झाल्यावर मोबाईलवर अर्जदारास कळविण्यात येणार आहे. स्वत:च्या वाहनाने जाण्याबाबत २,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ८३ अर्ज नागपूर शहरातील कंटोन्मेंट झोनमधील असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. २२६ अर्जदारांनी नागपूर येथील त्यांचा पत्ता नमूद केला नाही व अपूर्ण आहे. उर्वरित २,१५३ अर्जांमध्ये ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला. या २,१५३ अर्जदारांना ६ मे रोजी महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू अथवा तहसील कार्यालयामधून परवानगीचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ८६२ अर्जदारांच्या परवानगीचे वितरण संबंधित तहसीलदार कार्यालयातून केल्या जाणार आहे.परवानगीसाठी महाराष्ट्र पोलीस ई-पास प्रणालीवर ज्या अर्जदारांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील क्षेत्रातून अर्ज केले आहेत, त्याबाबत ऑनलाईन ८ मेपासून कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदीcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर