शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयकुमारच्या चित्रपटात अधिकाऱ्यांचा सहभाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 20:35 IST

१९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशातून सर्वोत्कृष्ट दहा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तीन राज्याचे सचिव व अभियान संचालकांना केंद्र शासनाच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशनचे विशेष दूत सिनेअभिनेते अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी होऊन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देस्पर्धेतून होणार निवड : १९ नोव्हेंबरला स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशातून सर्वोत्कृष्ट दहा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तीन राज्याचे सचिव व अभियान संचालकांना केंद्र शासनाच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशनचे विशेष दूत सिनेअभिनेते अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी होऊन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.या स्पर्धेत स्वच्छतेसाठी ग्रामीण भागातील कुटुंबांच्या गृहभेटी, जनजागृतीसाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता रॅलीचे आयोजन, हागणदारीमुक्तीचे बोर्ड लावणे, शौचालयाच्या एका खड्ड्याचे दोन खड्ड्यात रुपांतर करणे, सोनखत निर्मितीसाठी जनजागृती, गोबरधन, बायोगॅस युनिट, पायाभूत सर्वेक्षणात सुटलेल्या व वाढीव कुटुंंबात शौचालयाचे बांधकाम, जागतिक शौचालय दिनानिमित्त जनजागृती सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्रम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पंचायत समितींमार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे छायाचित्र, व्हीडीओ आणि इतर माहिती केंद्र शासनाच्या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८ या स्पर्धेत सहभागी होऊन नाविन्यपूर्ण व कल्पक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.स्पर्धा दहा मुद्यांवर आधारितकेंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने शौचालयाच्या नियमित वापरासोबत स्वच्छतेच्या सर्वांगीण जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८ हे या स्पर्धेचे नाव असून, यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत  जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता विषयक उपक्रमांचा दर्जा आणि तीव्रता या मुद्यांवर ही स्पर्धा आधारित आहे. 

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारnagpurनागपूर