अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:59+5:302021-01-02T04:08:59+5:30

कामठी : खैरी (ता. कामठी) येथील श्री हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सप्ताहाची गुरुवारी ...

Akhand Harinam concludes the week | अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

कामठी : खैरी (ता. कामठी) येथील श्री हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सप्ताहाची गुरुवारी (दि. ३१) सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

शेवटच्या दिवशी मधुकर ठाकरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. दहीहांडी फोडून प्रसाद वितरणाला सुरुवात करण्यात आली. स्थानिक व परिसरातील शेकडाे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी धर्मराज ठाकरे, पंढरी ठाकरे, किशोर धांडे, नारायण वाघाडे, धोंडबा कडू, मुरलीधर ठाकरे, गजानन ठाकरे, ईश्वर ठाकरे, नागो गाते, विठ्ठल चौधरी, नामदेव चौधरी, रामकृष्णा ठाकरे, कृष्णा ठाकरे, धर्मराज आदमने, सुरेश धांडे, गोलू ठाकरे, नरेश धांडे, बादल बावणे, राजेश ठाकरे, बन्सीलाल वाघाडे, मोरेश्वर ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, रतन काळे, अमित जोगे, धनराज ठाकरे, दौलत बुरघाटे, कृष्णा ठाकरे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते. चक्रधर माउली महिला भजन मंडळ खैरी व बालगंधर्व हरिपाठ भजन मंडळ खैरी यांच्या भजनाचा कार्यक्रमही पार पडला. संचालन व आभारप्रदर्शन किशोर धांडे यांनी केले.

Web Title: Akhand Harinam concludes the week