शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.चा आखाडा आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:12 AM

नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी, दि.२६ रोजी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. यात ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील १३५९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

ठळक मुद्दे३७४ ग्रा.पं.मध्ये मतदान७३०३ उमेदवार रिंगणातभाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची अग्निपरीक्षाएकूण मतदार - ५,९९,६६एकूण मतदान केंद्र - १३५९

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी, दि.२६ रोजी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. यात ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील १३५९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात ६ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले. त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी थेट निवडणूक होईल. यात एकूण २९४० जागांसाठी मतदान होईल. जिल्ह्यातील ३७४ सरपंचपदासाठी १३०९ उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच ३७४ ग्रा.पं.च्या विविध संवर्गातील सदस्य पदासाठी ५९९४ उमेदवार रिंगणात आहेत.१५ सप्टेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटपानंतर जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकींचा गागोगावी फड रगंला होता. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत अधिकाधिक ग्रा.पं.मध्ये सत्ता मिळविण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्ह्यात ग्रा.पं.च्या प्रचारात उडी घेतल्याचे दिसून आहे.राजकीयदृष्ट्या विचार केल्यास नागपूर जिल्ह्यावर भाजपचे प्रभृत्त्व आहे. मात्र अजूनही ग्रा.पं.पातळीवर काँग्रेसची पांरपरिक पकड आहे. त्यामुळे बहुतांश ग्रा.पं.मध्ये भाजप आणि काँग्रेसप्रणीत पॅनेलमध्ये काट्याची टक्कर असल्याचे चित्र आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बसपाने आपले पॅनेल या निवडणुकीत लढविले आहे. काही तालुक्यात या पक्षांचे उमेदवार काँग्रेस आणि भाजप समर्थित पॅनेलच्या उमेदवारांना घाम फोडतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही ग्रा.पं.मध्ये तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहे.तगडा पोलीस बंदोबस्तग्रा.पं.निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्यानंतर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत कुठेही गोंधळ होणार नाही. त्यादृष्टीने अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर नागपूर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी ग्रा.पं. निवडणुकीत मोठ्या संख्येने भाग घेत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक