शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आकाशी झेप घे रे पाखरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:08 PM

पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर (गदिमा) आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी या महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गीत, संगीत, कविता, नाट्य आणि नकलांनी सजलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.

ठळक मुद्देपु.ल., गदिमा व बाबूजी जन्मशताब्दी : सांस्कृतिक संचालनालयाचा संगीतमय सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर (गदिमा) आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी या महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गीत, संगीत, कविता, नाट्य आणि नकलांनी सजलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र येथे या सर्वांगसुंदर कार्यक्रमाचे आयोजन झाले. कुणाल गडेकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात गुणवंत घटवई, मंजिरी वैद्य यांनी सुरेल गाणी सादर केली. ‘माझे जीवनगाणे..., एकाच या जन्मी जणू..., इंद्रायणीच्या काठी..., जीवलगा कधी रे येशील..., आकाशी झेप घे रे पाखरा...’ अशी एकाहून एक मराठी भावगीत, चित्रपट गीते व नाट्यपदे सुरेलपणे सादर करून श्रोत्यांना तृप्तीचा आनंद दिला. मंजिरी वैद्य यांनी गायलेल्या ‘जाळीमंदी पिकली करवंद...’ या लावणीला रसिकांकडून वन्स मोअरची दाद मिळाली. गायकांच्या स्वरांना विशाल दहासहस्र, गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्र यांनी वाद्यतंत्रांची साथसंगत केली. गीतसंगीतासह नाटकांची छटाही कलावंतांनी पेरली. सतीश ठेंगडी, कलाधर रानडे, नाना पंडित, अभय बाळदे, अरुण जोशी, वर्षा लाखे, अंकिता पोहरकर यांनी पु.ल. यांच्या विविध नाटकातील पात्र साकारले. नाटकातील या दृश्यांनी श्रोत्यांना खळखळून हसविले. गदिमा आणि बाबूजी यांच्या गीत रामायण या अजरामर सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला दमक्षेसां केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, कुणाल गडेकर, अल्का तेलंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदन भाग्यश्री चिटणीस यांचे होते. कार्यक्रमाच्या आयोजनात अभिजित मुळे, मकरंद भालेराव, वसंत खडसे आदींचा सहभाग होता.यादरम्यान पु.लं.ची छटा असलेल्या तीन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यास नागपूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :South Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रNatakनाटक