शिवगाण स्पर्धेत आकांक्षा व गायत्री कॉन्व्हेंट प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST2021-02-14T04:07:54+5:302021-02-14T04:07:54+5:30
नागपूर : छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘शिवगाण स्पर्धा’ नागपूरसह विदर्भात एकाचवेळी पार पडली. या स्पर्धेत वैयक्तिक गटात आकांक्षा ...

शिवगाण स्पर्धेत आकांक्षा व गायत्री कॉन्व्हेंट प्रथम
नागपूर : छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘शिवगाण स्पर्धा’ नागपूरसह विदर्भात एकाचवेळी पार पडली. या स्पर्धेत वैयक्तिक गटात आकांक्षा चारभाई, तर सांघिक गटात गायत्री कॉन्व्हेंटने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत विजयी झालेले दोन्ही गटातील प्रथम कलावंतांना अंतिम स्पर्धेत स्थान देण्यात येणार असून, ही स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर अजिंक्यतारा गड (जि. सातारा) येथे होणार आहे.
स्पर्धेत वैयक्तिक गटात तेजस्विनी खोडकर, द्वितिय, तर श्रावणी खंडाळे व आदित्य सावरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्वप्निल हरदास यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांघिक गटात स्वरवारी संगीत समूहाला द्वितिय, तर आर. एस. मुंडलेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. मेश्राम ग्रुपला प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपुरात ही स्पर्धा अमृत भवनम, उत्तर अंबाझरी मार्ग येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. संचालन मधुरा कोलारकर यांनी केले, तर आभार मकरंद भालेराव यांनी मानले. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ गायक पं. मोरेश्वर निस्ताने आणि माधुरी अशीरगडे यांनी केले. यावेळी, संजय भाकरे, कुणाल गडेकर, श्याम निसाळ, मोहन पात्रीकर, दिलीप देवरणकर, किशोर डाऊ, मंजुषा देव, मृणाल यादव, संजीवनी चौधरी, अनुप उंबरकर, रेखा भोंगाडे, संगीता जगताप, अर्चना पांडे, नागेश विध्वंस, ओंकार कापसे, वैभव चौधरी, स्वप्निल बन्सोड, राजेश पाणूरकर उपस्थित होते.
..............
फोटो ओळी :- शिवगाण स्पर्धा प्राथमिक फेेरीतील विजेते.