लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी प्रतीक्षित असलेली नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता लवकरच सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस दररोज सकाळी ९.५० वाजता अजनीहून सुटेल आणि रात्री ९.५० वाजता पुण्यात पोहोचेल. तर गाडी क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) संध्याकाळी ६.२५ वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता अजनीला पोहोचेल. केवळ सुरुवातीची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
गाडी क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ९.५० वाजता अजनी येथून रवाना होत १०.४० वाजता वर्धा दुपारी १२.०३ वाजता बडनेरा, १ वाजता आकोला, २.५५ वाजता भुसावळ, ३.२६ वाजता जळगाव, सायंकाळी ५.२५ वाजता मनमाड, ६.२० वाजता कोपरगाव, ७.३५ वाजता अहमदनगर, रात्री ८.४३ वाजता दौंड कॉर्ड लाइन आणि रात्री ९.५० वाजता पुण्याला पोहोचेल. गाडी क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) सायंकाळी ६.२५ वाजता पुण्याहून रवाना होऊन, नमूद स्टेशनवर प्रत्येकी २ मिनिटे थांबून सकाळी ६.२५ वाजता अजनीला (नागपूर) पोहेचेल. गाडी क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यात सोमवार सोडून इतर ६ दिवस चालेल. याप्रमाणेच गाडी क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) आठवड्यात मंगळवार सोडून इतर ६ दिवस चालेल.
नागपुरातच होणार मेंटेनन्समध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात या गाडीचा समावेश झाला आहे. अजनी स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर या गाडीचे स्वागत अधिक चांगल्या पद्धतीने करता आले असते व प्रवाशांनाही चांगल्या सुविधा मिळाल्या असत्या. वंदे भारत एक्स्प्रेसचे प्राथमिक देखभाल-दुरुस्ती कार्य नागपूरमध्येच होणार आहे.
प्रवाशांना मिळेल सुविधासणासुदीच्या काळात नागपूर-पुणे यादरम्यान विद्यार्थी, नोकरदारवर्ग आणि सामान्य प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात.व्यापारीवर्गही या मार्गावर वारंवार 3 ये-जा करतो. अशावेळी बंदे भारत एक्स्प्रेस त्यांच्यासाठी विमान सेवेपेक्षा अधिक सुलभ व स्वस्त पर्याय ठरू शकतो.