अजनीतील खुनाच्या आरोपींना २८ पर्यंत ‘पीसीआर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST2021-07-26T04:08:36+5:302021-07-26T04:08:36+5:30
नागपूर : अजनीच्या कौशल्यानगरात खून आणि खुनाच्या प्रयत्नाची घटना घडल्यानंतर, रविवारी तणावपूर्ण शांतता होती. आरोपी शिवम उर्फ शक्तिमान गुरुदेवचे ...

अजनीतील खुनाच्या आरोपींना २८ पर्यंत ‘पीसीआर’
नागपूर : अजनीच्या कौशल्यानगरात खून आणि खुनाच्या प्रयत्नाची घटना घडल्यानंतर, रविवारी तणावपूर्ण शांतता होती. आरोपी शिवम उर्फ शक्तिमान गुरुदेवचे काही साथीदार फरार आहेत. त्यामुळे पुन्हा परिसरात वाद होऊ शकतो, या शंकेमुळे परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांनी शुक्रवारी रात्री स्वयंम नगराळे (२१)च्या खुनातील आरोपी निशांत अरविंद घोडेस्वार (२२) आणि साथीदारांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना बुधवार, २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर शुभम उर्फ शक्तिमान मेडिकल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आहे. शक्तिमानवर चोरी व इतर घटनात ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासात सर्व आरोपी निशांत घोडेस्वारने स्वयंमला चाकू मारल्याची कबुली देत आहेत, तर पोलिसांनी स्वयंमच्या खुनामुळे संतप्त झालेल्या मित्रांकडून शनिवारी सकाळी शक्तिमानच्या खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी आकाश मनवर, बिरजू शिंदे, सुनील वानखेडे, अभिषेक घोडेस्वार यांना न्यायालयासमोर हजर केले. या आरोपींना २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी रविवारी दिवसभर कौशल्यानगरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
..............