शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात शंभरकर टोळीचा अजनीत हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:07 IST

- खंडणी वसुलीचा प्रयत्न - जीवे मारण्याची धमकी - परिसरात प्रचंड दहशत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अजनीतील कुख्यात ...

- खंडणी वसुलीचा प्रयत्न

- जीवे मारण्याची धमकी

- परिसरात प्रचंड दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनीतील कुख्यात गुंड केतन अशोक शंभरकर (वय ३१) आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी रविवारी रात्री प्रचंड हैदोस घातला. वाहनांची तोडफोड करून शस्त्राच्या धाकावर अनेकांना मारहाण केली तसेच खंडणीची मागणी करून अनेकांना धमक्याही दिल्या. सुमारे तासभर त्यांचा हा हैदोस सुरू होता. त्यामुळे न्यू बाबूलखेडा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

कुख्यात केतन शंभरकर, सुरज उर्फ ईल्ली विजय गजभिये, अमित शंभरकर या तिघांनी प्रारंभी नाईक नगरात पानटपरी चालवणारा वैभव अनिल वासेकर याच्यावर सोमवारी रात्री हल्ला केला. वैभव हा मानवता स्कूलजवळ पानटपरी चालवतो. येथे पानटपरी लावायची असेल तर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत तलवार दाखवत वैभवला मारहाण करण्यात आली. त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी वैभव अजनी पोलीस ठाण्याकडे गेला तर आरोपी केतन, ईल्ली, अमित तसेच मयूर राजरतन बनकर, बंटी उर्फ निशांत बनकर, कुणाल नामदेव बनकर, अक्की उर्फ अक्षय श्रावण ग्वालबन्सी आणि योगेश बंडू सोनवणे यांनी बाबुलखेडा परिसरात हैदोस घालणे सुरू केले. त्या भागात राहणाऱ्यांच्या चार दुचाकी, एक रिक्षा, दोन चारचाकी आणि अन्य वाहनांची आरोपींनी तोडफोड केली. त्यांच्या हातात शस्त्र होती. यावेळी शस्त्रांच्या जोरावर येणार्‍या-जाणार्‍या लोकांना शिवीगाळ करून ते त्यांच्या मागे धावत होते. त्यामुळे न्यू बाबुलखेडा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. यावेळी अनिकेत नरेंद्र बनकर याने आरोपींना हटकले असता, अक्की उर्फ अक्षय ग्वालबन्सी याने अनिकेतला दगड फेकून मारला. तो डोळ्याजवळ लागल्याने अनिकेत जबर जखमी झाला. दरम्यान, आरोपींचा हैदोस सुरू असताना मिळालेल्या माहितीवरून अजनी पोलिसांचा ताफा तिकडे पाेहोचला. त्यामुळे आरोपी वेगवेगळ्या भागात पळून गेले. त्यानंतर सातही आरोपींना पोलिसांनी शोधून काढले. त्यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

---

कुख्यात केतन शंभरकर तसेच त्याच्या टोळीतील गुंडांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, दंगे करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्यामुळे ते लपूनछ्पून गुन्हे करत होते. रविवारी रात्रीच्या घटनेमुळे या टोळीने पुन्हा एकदा तोंड वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे.

---

आरोपींना बाजीरावची ओळख

या प्रकाराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, सोमवारी सकाळपासूनच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी अजनी पोलीस ठाणे गाठून आरोपींना बाजीरावची ओळख करून दिली. ठाणेदार विनोद चौधरी यांनी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची एक दिवसाची पोलीस कोठडी मिळवली.

---