शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका

By योगेश पांडे | Updated: March 12, 2023 13:52 IST

स्वत:च्या पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्यानंतरदेखील शिवसैनिक गप्प बसून आहेत हे आश्चर्यजनक आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधीमंडळात अर्थसंकल्प मांडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी शिवसेनाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) उद्धव ठाकरे बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डोळा मारल्याच्या मुद्द्यावरून भाजप राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात झाली आहे. डोळा मारून अजित पवारांनी एका प्रकारे उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली आहे.

स्वत:च्या पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्यानंतरदेखील शिवसैनिक गप्प बसून आहेत हे आश्चर्यजनक आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले. रविवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतात डोळे मारणारे दोनच नेते आहेत. एका नेत्याने मिठी मारल्यानंतर डोळा मारला होता आणि दुसरे आता अजित पवार हे आहेत. उद्धव ठाकरे अर्थसंकल्पाच्या विरोधात बोलत असताना अजित पवार यांनी डोळा मारला. मुळात अर्थसंकल्प चांगला आहे याची पवार यांना जाणीव होती आणि आता ठाकरे विरोधातच बोलतील व त्याला काहीच अर्थ नाही म्हणून त्यांनी डोळा मारला. उद्धव ठाकरे बोलताना अजित दादा यांच्या बॉडी लॅग्वेजमधून बरेच काही संकेत मिळत होते. तिथे गोंधळ व्हावा म्हणून लहान मुलांसारखे कागद खाली पाडण्यात आले. जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर कुणी डोळा मारू शकले असते का असा सवाल बोंडे यांनी केला.

बारामतीचा विकास हा राज्याचा विकास नाहीमहाविकास आघाडीच्या व तत्पुर्वी आघाडी सरकारच्या कार्यकाळात बारामतीचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्प सादर व्हायचा. बारामतीचा विकास झाला म्हणजे राज्याचा विकास झाला असे होत नाही. राज्यात अवकाळी पाऊस पडला तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी विदर्भात येऊन दौरे केले होते. दोघांनीही मोठमोठाल्या घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात चार हजार कोटींचे वाटपदेखील झाले नव्हते, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Bondeअनिल बोंडे