अजय गुल्हाने यांनी स्वीकारला स्मार्ट सिटीचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 20:12 IST2023-01-02T20:11:54+5:302023-01-02T20:12:29+5:30
Nagpur News नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.

अजय गुल्हाने यांनी स्वीकारला स्मार्ट सिटीचा पदभार
नागपूर : नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही अजय गुल्हाने यांनी जबाबदारी स्वीकारली.
मूळचे नागपूरचे असलेले अजय गुल्हाने भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१० बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला असून, ते वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा होते. ते नवी मुंबईतील ‘जलस्वराज्य प्रोजेक्ट’चे प्रकल्प व्यवस्थापकसुद्धा होते. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर गुल्हाने यांची स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारीसुद्धा देण्यात आली आहे.