अय्यर हे आधुनिक ऋषिच
By Admin | Updated: October 9, 2016 02:29 IST2016-10-09T02:29:26+5:302016-10-09T02:29:26+5:30
शिक्षणक्षेत्राच्या माध्यमातून पुढील पिढीकडे देशभक्तीचे संस्कार पोहोचविणे आवश्यक आहे.

अय्यर हे आधुनिक ऋषिच
बनवारीलाल पुरोहित यांचे प्रतिपादन
नागपूर : शिक्षणक्षेत्राच्या माध्यमातून पुढील पिढीकडे देशभक्तीचे संस्कार पोहोचविणे आवश्यक आहे. टी.जी.एल.अय्यर यांनी या माध्यमातून असंख्य विद्यार्थी घडविले. खऱ्या अर्थाने ते आधुनिक ऋषिच आहेत, असे मत आसामचे राज्यपाल व भारतीय विद्या भवनच्या नागपूर केंद्राचे सभापती बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले. भारतीय विद्या भवन,नागपूर केंद्राचे संचालक टी.जी.एल.अय्यर यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ शनिवारी सिव्हील लाईन्स येथील भवन्स सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
टी.जी.एल.अय्यर यांनी ३० वर्षे पोलीस व ३५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा केली. त्यांनी नेहमी समर्पित व सेवाभावी वृत्तीने काम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुलांमध्ये राष्ट्रभक्ती रुजविण्यात यश आले, असे पुरोहित म्हणाले.
यावेळी भारतीय विद्या भवनचे कार्यकारी सचिव एच.एन.दस्तुर, नवनिर्वाचित संचालक डॉ.अन्नपूर्णी शास्त्री, सिव्हील लाईन्स शाखेच्या प्राचार्या अंजू भुटानी, श्रीकृष्णनगर शाखेच्या प्राचार्या निरुपमा शंकर, आष्टी शाखेच्या प्राचार्या वंदना बिसेन, त्रिमूर्तीनगर शाखेच्या प्राचार्या पार्वती अय्यर, कोराडी शाखेच्या प्राचार्या सर्बानी बोस प्रामुख्याने उपस्थित होत्या. संचालन उमा दुराईराजन यांनी केले.(प्रतिनिधी)