आयटकचे 'खासदार महोदय जवाब दो' आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:29+5:302021-01-17T04:08:29+5:30

रामनगर येथे सकाळी ११ वाजता आंदाेलन सुरू झाले. आयटकचे राष्ट्रीय सचिव कॉ. सुकुमार दामले, राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे, ...

AITC's 'Answer MP' movement () | आयटकचे 'खासदार महोदय जवाब दो' आंदोलन ()

आयटकचे 'खासदार महोदय जवाब दो' आंदोलन ()

रामनगर येथे सकाळी ११ वाजता आंदाेलन सुरू झाले. आयटकचे राष्ट्रीय सचिव कॉ. सुकुमार दामले, राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे, शहर उपाध्यक्ष डॉ. युगल रायलु, आशा नेत्री व वर्षा चिखले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने गडकरी यांना निवेदन सादर केले. "सर्व शासकीय उद्योगांच्या खासगीकरणाचे धोरण आम जनता विरोधी आहे, पण आपल्या सहभागाने तसे कायदे, योजना पारित करण्यात येत आहेत. तुमचे हे धोरण जनतेच्या हिताचे कसे आहे, हे आम्हाला समजावून सांगावे", असे आवाहन त्यांना करण्यात आले. गडकरी यांच्याशी अर्धा तासांहून अधिक चर्चा करण्यात आली. विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा आयटकतर्फे विरोध करण्यात आला. गडकरी यांनी केंद्र शासनापर्यंत निवेदन पाेहोचविण्याचे आश्वासन दिले. आंदाेलनात ज्योती \Iअंडरसहारे.......\I, जयश्री चहांदे, आशा बोदलखंडे, शहर सचिव सी.एम. मौर्य, अब्दुल सादीक, युगल रायुलु, अरुण वनकर, मोहन बावने, मंदा डोंगरे, मंगला लोखंडे, करुणा साखरे, मंगला पांडे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.

Web Title: AITC's 'Answer MP' movement ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.