विमानतळाची सुरक्षा कडेकोट
By Admin | Updated: August 17, 2016 02:14 IST2016-08-17T02:14:03+5:302016-08-17T02:14:03+5:30
संभाव्य धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा कडेकोट केली

विमानतळाची सुरक्षा कडेकोट
सीआयएसएफचे गुरुजीत सिंग यांचे प्रतिपादन : अधिकाऱ्यांना पुरस्कार
नागपूर : संभाव्य धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा कडेकोट केली असून असून कुठल्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्ष बल पूर्णपणे सुसज्ज असल्याचे प्रतिपादन सीआयएसएफचे उप-कमांडंट गुरजीत सिंग यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, सीआयएसएफच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे तर दुसरीकडे जबाबदारी वाढली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ असो वा अन्य फोर्सचे अधिकारी व जवान दक्ष आहेत.
शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे. असामाजिक तत्त्वांना नागपूर विमानतळापासून दूर ठेवण्यात आम्हाला यश आले आहे. आम्ही एक जबाबदार नागरिकसुद्धा आहोत.
अधिकारी व जवानांना पुरस्कार
उल्लेखनीय कार्यासाठी नागपूर विमानतळावर कार्यरत सीआयएसएफचे अधिकारी आणि जवानांना पुरस्कार देण्यात आले. सहायक कमांडंट अनिल मलघाडे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. (प्रतिनिधी)