शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नागपुरात विमाने जागेवर उभी,दरदिवशी सरासरी ३० लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 23:59 IST

दररोज येणाऱ्याआणि जाणाऱ्या ५० उड्डाणांमुळे विमानतळाला दरदिवशी जवळपास ३० लाख रुपये आणि दरमहा ९ कोटी रुपयांचे उत्पन्न होते.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवार मध्यरात्रीपासून घरगुती विमान सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळावर शांतता आहे. विभिन्न शहरांना नागपूरशी जोडणाऱ्या वाहतुकीच्या या साधनांवर आता विराम लागला आहे. त्यामुळे उपराजधानी पूर्णत: लॉकडाऊन झाली आहे.नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू, इंदूर, अहमदाबाद, चेन्नई या शहरांसाठी विमानसेवा आहेत. याशिवाय दोहा व शारजाहकरिता दोन आंतरराष्ट्रीय विमाने आहेत. दररोज येणाऱ्याआणि जाणाऱ्या ५० उड्डाणांमुळे विमानतळाला दरदिवशी जवळपास ३० लाख रुपये आणि दरमहा ९ कोटी रुपयांचे उत्पन्न होते. विमान सेवा केव्हा बहाल होईल, यावर स्थिती अजूनही स्पष्ट नाही. पण उपराजधानीत कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे, बस आणि विमानसेवा बंद असल्याने आता नागपूरने स्वत:ला वेगळे केले आहे. ही बाब नागपूरकरांच्या जागरूकतेमुळे शक्य झाली आहे.चार विमाने विमानतळावर उभी राहणारविमानतळावर गो एअरची दोन आणि इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने नाईट पार्किंगला असतात. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दोन कंपन्यांची एकूण चार विमाने नागपुरात पोहोचली, पण बंदीमुळे नागपुरातच थांबली.सर्व मार्गांवर तपासणीविमानतळासाठी विजयनगर आणि वर्धा रोडशी जुळलेल्या दोन मार्गांवर सीआयएसएफ आणि पोलिसांचे लक्ष आहे. दोन्ही मार्गांवरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर तपासणी करण्यात येत आहे. पण उड्डाणे बंद झाल्यानंतर या मार्गावरून जाणारी वाहने जवळपास बंद झाली आहेत.केवळ संचालनाशी संबंधित कर्मचारी राहणारसर्व उड्डाणे थांबल्यानंतरही विमानतळावर संचालन शाखेशी जुळलेले कर्मचारी मर्यादित संख्येत तैनात राहतील. कारण कोणतेही सरकारी विमान आणि भारतीय वायुसेनेच्या विमानाची ये-जा केव्हाही होऊ शकते. याशिवाय कोणत्याही वैद्यकीय सेवेसाठी विमानतळाला नेहमीच सज्ज राहावे लागते. उड्डाणांचे संचालन होत नसल्याने विमानतळाला तोटा सहन करावा लागत आहे. लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही पालन करीत आहोत.मो. आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर