एअर इंडियाच्या विमानानेच होणार हज यात्रा

By Admin | Updated: September 9, 2015 03:06 IST2015-09-09T03:06:40+5:302015-09-09T03:06:40+5:30

मागील वर्षी हजयात्रेच्या उड्डाणात विलंब होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियातर्फे त्यांचीच विमाने हजयात्रेला जाणार आहेत.

Air India will be on Haj pilgrimage | एअर इंडियाच्या विमानानेच होणार हज यात्रा

एअर इंडियाच्या विमानानेच होणार हज यात्रा

उड्डाणास विलंब न होण्याचा दावा
वसीम कुरेशी नागपूर
मागील वर्षी हजयात्रेच्या उड्डाणात विलंब होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियातर्फे त्यांचीच विमाने हजयात्रेला जाणार आहेत. नागपूर इम्बार्केशन पॉर्इंटपासून एअर इंडियाचे बोर्इंग ७७७ ईआर विमान हजयात्रींना घेऊन जाणार आहे. दरम्यान, काही अडचण आल्यास मुंबईतही अतिरिक्त विमानाची सोय करण्यात आली आहे. यात्रेत कुठलाही विलंब होऊ नये म्हणून विमान नागपुरात पोहोचले असून, मिहान परिसरातील एअर इंडियाच्या एमआरओत हे विमान ठेवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता विमान एअरपोर्ट रनवेकडे टॅक्सी वेमार्गे निघेल.
नागपुरात आणण्यात आलेले हे विमान नवे असून कंपनीतर्फे ते युरोपसाठी उड्डाण भरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजयात्रेची संपूर्ण तयारी झाली आहे. ९ सप्टेंबरपासून ही यात्रा सुरू होणार आहे. यासाठी अभियंत्यांची चमू तयार आहे. हजयात्रेसाठी एअर इंडिया दुसऱ्या एअरलाईन्सला कंत्राट देत होती. मागील वर्षी कंत्राट मिळविणाऱ्या दोन एअरलाईन्सची नावेही समोर आली होती. यात पहिल्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही फ्लाईट रवाना करण्यात आले. बँकॉकमधून विमानाचे सुटेभाग पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे यात्रेच्या पहिल्या उड्डाणाला सहा तास विलंब झाला. काही वर्षांपूर्वी एअर इंडियाचे ४०० आसनी जम्बो विमानही हजयात्रेसाठी चालविण्यात आले होते. एअर इंडिया आता दुसऱ्या एअरलाईन्सवर विश्वास ठेवण्याच्या मूडमध्ये नसून कुठलीही तक्रार होऊ नये म्हणून प्रयत्नरत आहे.
कोचीनवरून येणार विमान
९ सप्टेंबर रोजी नागपुरातून दोन विमाने जाणार आहेत. नागपुरातून जाणाऱ्या भाविकांत १०० यात्रेकरू जास्त आहेत. त्यामुळे कोचीन येथून उड्डाण भरणारे एअर इंडियाचे विमान दुपारी ४ वाजता अतिरिक्त यात्रेकरूंना घेऊन हजला रवाना होणार आहे.

Web Title: Air India will be on Haj pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.