शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

नागपुरात एअर इंडियाचे आज, उद्या अतिरिक्त उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:55 IST

एअर इंडियाच्या एमआरओमध्ये नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाचे एआय १४६९ नागपूर-दिल्ली अतिरिक्त उड्डाण रविवार, २४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून दिल्लीला सकाळी १०.१५ वाजता पोहोचणार आहे.

ठळक मुद्देविमानांची एमआरओमध्ये देखभाल, दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअर इंडियाच्या एमआरओमध्ये नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाचे एआय १४६९ नागपूर-दिल्ली अतिरिक्त उड्डाण रविवार, २४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून दिल्लीला सकाळी १०.१५ वाजता पोहोचणार आहे.विमानाचे संचालक बोईंग ७७७-२०० एलआरसह (लॉन्ग रेंज) करण्यात येणार आहे. विमानाने २४० दिवसांचे उड्डाण केल्यामुळे फेसचेक करणे अनिवार्य होते. एअर इंडियाच्या ताफ्यात या प्रकारची तीन विमाने आहेत. फेसचेक पाच दिवसांचे असते. या विमानाला एमआरओमध्ये दुरुस्तीनंतर पुन्हा अतिरिक्त उड्डाण म्हणून चालविण्यात येते.एमआरओमध्ये दुसरे विमान मुंबईहून २४ फेब्रुवारीला फेसचेक नियमित तपासणीसाठी येणार आहे. त्यानंतर हेच विमान एआय-१६२८ सोमवार, २५ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता नागपुरातून मुंबईला रवाना होईल. उड्डाण बोर्इंग ७७७-३०० ईआरसह (एक्सटेंडेड रेंज) होणार आहे. या विमानाचे उड्डाण २४० दिवस आणि दोन हजार तासांचे झाले आहे.कमी अंतरानंतरही जास्त भाडेनागपुरातील एमआरओमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानाच्या अतिरिक्त उड्डाणाचे भाडे कमी अंतर असतानाही जास्त आकारण्यात येणार आहे. नागपूर ते मुंबईचे अंतर कमी आहे. त्यानंतरही ५२४० रुपये आणि दिल्ली-नागपूरचे भाडे ३०४९ रुपये आकारण्यात येणार आहे. जास्त बुकिंग असल्यामुळे कमी शुल्क आणि कमी बुकिंग असल्यामुळे जास्त शुल्क असल्याचे एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले.सहा विमानांचे उशिरा लॅण्डिंगदेशाच्या अन्य शहरांमधून नागपुरात येणाऱ्या विमानांना २० मिनिटे ते दोन तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे नागपुरातून अन्य शहरात जाणाऱ्या या विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले.सकाळी इंडिगोचे बंगळुरू येथून नागपुरात सकाळी ७.४५ वाजता येणारे ६ई५०९ विमान १ तास १४ मिनिटे उशिरा अर्थात ८.५९ वाजता आले. जेट एअरवेजच्या मुंबई-नागपूर ९डब्ल्यू६८३ या विमानाला १९ मिनिटे उशीर झाला. तर इंडिगोचे ६ई४८२ मुंबई-नागपूर विमान सकाळी १० ऐवजी ३८ मिनिटे उशिरा १० वाजून ३८ मिनिटांनी पोहोचले. इंडिगो कंपनीचे ६ई९२६ कोलकाता-नागपूर विमान दुपारी २ वाजून ५० मिनिटांऐवजी २१ मिनिटे उशिरा ३.११ वाजता पोहोचले. तसेच इंडिगोचेच ६ ई४३६ इंदूर-नागपूर विमान तब्बल २ तास ४ मिनिटे उशिरा अर्थात सायंकाळी ७.५५ ऐवजी रात्री ९.५९ वाजता आले. याशिवाय एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान रात्री ८.३५ ऐवजी १ तास ४४ मिनिटे उशिरा अर्थात रात्री १०.१९ वाजता पोहोचले.सहा विमाने नागपुरात उशिरा आल्यामुळे नागपुरातून अन्य शहरांमध्ये विमानांना उड्डाण भरण्यास उशीर झाला.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर