एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:23 PM2019-07-23T23:23:39+5:302019-07-23T23:24:43+5:30

एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले.

Air India flights to Mumbai via Visakhapatnam | एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले.
हजच्या उड्डाणासाठी एअर इंडियाने विमानाला नागपूर-मुंबई आणि विशाखापट्टणम-मुंबई एकत्रित करून चालविले. याच कारणामुळे नागपुरातून परतीनंतर विमानाच्या क्रमांकात बदल केला नाही. एआय६२९ दररोज नागपुरातून मुंबईला परत जाताना ६३० क्रमांकाने उड्डाण भरते. सोमवारी हेच विमान मुंबईहून विशाखापट्टणम मार्गे नागपुरात आले होते.
एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, हज उड्डाणासाठी विमानाच्या व्यवस्थेत सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांसाठी बदल केला आहे. एअर इंडियाचे सकाळचे मुंबई-नागपूर-मुंबई उड्डाण १ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत आठवड्यात तीन दिवस बंद राहील आणि चार दिवस सुरू राहील. या कालावधीत एआय६२७ मुंबई-नागपूर व एआय ६२८ नागपूर-मुंबई विमान आठवड्यात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला उपलब्ध राहील. आठवड्यात अन्य दिवसात ही उड्डाणे रद्द राहतील. हज उड्डाणांसाठी काही शेड्यूल विमानांचे संचालन अस्थायीरीत्या बंद करण्यात आले आहे. देशात हजकरिता महत्त्वपूर्ण एम्बॉर्केशन पाईंटवरून एक वा दोन उड्डाणांमध्ये वाढ झाली आहे. याच कारणामुळे एअर इंडियाने वेळापत्रकात बदल केला आहे.

Web Title: Air India flights to Mumbai via Visakhapatnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.