विमानतळाला हवा बुस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:20+5:302021-03-15T04:07:20+5:30
नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचे संचालन सध्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या वतीने करण्यात येत आहे. ...

विमानतळाला हवा बुस्ट
नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचे संचालन सध्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु विमानतळाच्या विकासासाठी तिसऱ्या पार्टनरचा शोध घेण्यात येत आहे. तिसरा पार्टनर मिळाल्यानंतर विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे
कनेक्टिव्हिटी हवी : सध्या नागपूर विमानतळावर अलाहाबाद, लखनऊ, पटना, राची, रायपूर, भोपाळ आणि शारजाहसाठी विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे.
प्रकल्पाची किंमत : नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी १६८५ कोटी रुपये लागणार आहेत. परंतु विमानतळाचा विकास खासगीकरण झाल्यानंतर होणार आहे. त्यासाठी मागील १० वर्षांपासून खासगी गुंतवणूकदारांचा शोध घेण्यात येत आहे.
या हव्यात सुविधा : विमानतळावर दुसरा रण वे, न्यू टर्मिनल बिल्डिंग, नवे स्टॉल्स, पार्किंगची व्यवस्था आणि इतर बाबींची गरज आहे. परंतु शासनाने अर्थसंकल्पात काहीच तरतूद न केल्यामुळे विमानतळाचा विकास होऊ शकला नाही. केवळ कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून इतर विकास कामे ठप्प आहेत.
नव्या गुंतवणूकदाराची प्रतीक्षा : मागील दहा वर्षांपासून विमानतळाच्या विकासासाठी गुंतवणूकदार शोधण्यात येत आहे, परंतु कोणतीच कंपनी पुढे येत नसल्यामुळे विमानतळाचा विकास रखडला आहे आता गुंतवणूकदार शोधण्यासाठी कन्सल्टंट नियुक्त करण्यात येत आहे.
......