ऐक्यम, साहसतर्फे वृक्षलागवडीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:40+5:302021-07-31T04:09:40+5:30
काटाेल : ऐक्यम क्लब आणि साहस ॲडव्हेंचरच्या पदाधिकाऱ्यांनी काटाेल शहर व तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. या ...

ऐक्यम, साहसतर्फे वृक्षलागवडीचा संकल्प
काटाेल : ऐक्यम क्लब आणि साहस ॲडव्हेंचरच्या पदाधिकाऱ्यांनी काटाेल शहर व तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. या दाेन्ही संस्थांच्यावतीने काटाेल शहरालगतच्या जुनेवाणी येथे वृक्षाराेपण करण्यात आले असून, यात २०० राेपट्यांची लागवड करण्यात आली आहे. शिवाय, या राेपट्यांच्या याेग्य संगाेपनाची जबाबदारीही या संस्थांनी स्वीकारली आहे.
या उपक्रमांत नागरिकांना सहभागी करून घेत त्यांना पर्यावरण व मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यांच्या मदतीने वृक्षाराेपण केले जात असल्याचेही या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले असून, जुनेवाणी येथे कडुनिंब व गुलमाेहराच्या राेपट्यांची लागवड केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सचिन वाळके, बहुदेव बहुरुपी, ललित सनेसर, प्रतीक वानखेडे, प्रज्वल देशमुख, मिथिलेश धिरडे, विवेक चौधरी, सुधांशू जोशी, संचिता टोनपे, तनूश्री गजभिये, साक्षी चौधरी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी वृक्षाराेपण केले.