२४० एकर जागेवर ‘एम्स’

By Admin | Updated: March 20, 2015 02:38 IST2015-03-20T02:38:36+5:302015-03-20T02:38:36+5:30

मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या जागेला नापसंती देत, मिहानच्या २४० एकरच्या जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान....

'AIIMS' at 240 acres | २४० एकर जागेवर ‘एम्स’

२४० एकर जागेवर ‘एम्स’

नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या जागेला नापसंती देत, मिहानच्या २४० एकरच्या जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) उभारणीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सूत्रानुसार, ही जागा लवकरच ताब्यात घेण्यात येणार असून संरक्षण भिंत टाकण्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
केंद्राच्या २२०० कोटी रु पयांचा हा प्रकल्प मेडिकलशेजारी उभा राहणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये केली होती. यासाठी मेडिकलच्या टीबी वॉर्डासह, मध्यवर्ती कारागृहामागील जागा, लघु सिंचन विभागाची जागा आणि मेडिकलच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील वैद्यकीय वसाहतीची एकूण साधारण २०० एकर जागेवर हा प्रकल्प उभा करण्याचे प्रस्तावित होते. परंतु या जागेवर असलेले विविध विभाग हलविणे खर्चिक आणि वेळखाऊ होते. दरम्यानच्या काळात एम्सच्या अभ्यासक मंडळाने मिहानमधील जागेचाही शोध घेतला.
मिहान आणि टीबी वॉर्ड असे दोन्ही ठिकाणी एम्सचा विचार सुरू झाला. याला घेऊन १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव के. सी. सामरीया यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय पथकाने टीबी वॉर्ड व मिहनमधील जागेची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी टीबी वॉर्डाच्या जागेला जागेवरच नापसंती दिली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पथकाला मिहान येथे प्रस्तावित जागेच्या प्रत्यक्ष ठिकाणावरील जागेच्या मुबलकतेसोबतच वीजपुरवठा, पाणीपुरवठा, रस्ते, हवाई आणि रेल्वेमार्ग उपलब्ध होत असल्याने त्यांनी या जागेला पसंती दिली आहे. लवकरच या संदर्भातील अहवाल समोर येणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांत जागेचा ताबा आणि येत्या तीन महिन्यात संरक्षण भिंतीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: 'AIIMS' at 240 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.